आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhvi Who Completed PhD From USA Arrived In Ujjain

अमेरिकेतून PhD करणारी तरुणी बनली स्मशानात साधना करणारी अघोर तांत्रिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अघोरी महिला तांत्रिक शिवानी दुर्गा. - Divya Marathi
अघोरी महिला तांत्रिक शिवानी दुर्गा.
इंदूर/उज्जैन - सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उज्जैनमध्ये विविध वेशभुषांमध्ये, काही खास वैशिष्ट्य असणारे साधुसंत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहेत. आम्ही अशाच एका साध्वीची भेट तुम्हाला घडवणार आहोत. विशेष म्हणजे या साध्वी अमेरिकेतून पीएचडी केल्यानंतर स्मशानात साधना करणाऱ्या अघोरी तांत्रिक आणि स्पिरिच्युअल गाइड बनल्या आहेत.

आजी घेऊन जायची स्मशानात, तीच होती पहिली गुरू
सर्वेश्वरी शक्ती इंटरनॅशनल अखाड्याच्या संस्थापक शिवानी दुर्गा यांनी सांगितले की, त्यांची आजी धार्मिक कार्य करायची. साधारणपणे महिला स्मशानात जात नाहीत. पण माझी आजी खूपच निर्भीड होती. ती केवळ एकटीच स्मशानात जात नव्हती तर मलाही सोबत घेऊन जायची. आजी मला त्याठिकाणी जळत असलेल्या मृतदेहांना नमस्कार करायला सांगायची. आजी म्हणायची हे मानवाचे अंतिम शरण स्थळ आहे. याला घाबरायचे नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. नातेवाईकांच्या विरोधानंतरही त्यांनी नागनाथ योगेश्वर गुरू यांच्याकडून अघोरी तंत्राची दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांच्याबरोबरच स्मशानात जाऊन शव साधना केली.

तयार करत आहेत महिला अखाडा
शिवानी दुर्गा अघोर तंत्राबरोबर पश्चिमात्य देशांमधील गूढ तंत्र विक्का, वोडू, सोर्करी याच्याही साधिका आहेत. त्यांचे भक्त आणि अनुयायी जगातील अनेक देशांमध्ये आहेत. भारतीय आणि पाश्चिमात्य तंत्रातील समानतांमधून त्यांनी अनेक नवीन पद्धतींचा शोध लावला आहे.

अघोर म्हणजे शिव
शिवानी दुर्गा यांच्या मते, अघोर शिवाचे रुप आहे. जे घोर नाही म्हणजे सुंदर आहे असे अघोर. आम्ही सर्व अघोरी आहोत. कारण आमच्या सर्वांमध्ये शिव आहे. अघोरी मानवी मृतदेहाचे मांस खातात या अफवेबाबत शिवानी दुर्गा म्हणाल्या की, अघोरींना साधनेदरम्यान काहीही खाता येत नाही. मात्र साधनेनंतर भूक शांत करण्यासाठी तो काहीही खाऊ शकतो.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, साध्वी शिवानी यांचे फेसबूकवरून घेतलेले काही फोटो...