आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युपी पोलिसांच्या मॉक ड्रिलमध्ये डमी दंगलखोरांच्या हातात दिला भगवा झेंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अलाहाबादमध्ये पोलिसांच्या मॉक ड्रिलमध्ये डमी दंगलखोरांच्या हातात दिसत असलेला भगवा झेंडा.)

अलाहाबाद- उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये पोलिसांनी मॉक ड्रिलमध्ये डमी दंगलखोरांच्या हातात भगवा झेंडा दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मा‍त्र, पोलिसांनी मॉक ड्रीलमध्येे कोणत्या हिंदुत्त्ववादी संघटनेचे प्रतिकात्मक दंगलखोर उभे केले होते, हे अद्याप समजू शकले नाही. अलाहाबादचे एसएसपी के. एस. इमेनुएल यांनीही याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे.

यापूर्वी गुजरात पोलिसांच्या मॉक ड्रिलमध्ये डोक्यावर टोपी घातलेले दंगलखोर 'अल्लाह हू अकबर'च्या घोषणा देताना दिसले होते.
डमी दंगलखोरांनी पोलिसांच्या नाकी नऊ अाणले...
अलाहाबादमध्ये पोलिसांच्या मॉक ड्रिलमध्ये प्रतिकात्मक दंगलखोरांच्या हातात भगवा झेंडा दाखवल्याने देशात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दंगलखोरांची ओळख दर्शवण्यासाठी त्यांच्या हातात भगवे झेंडे दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. डमी दंगलखोरांनी पोलिसांशी मोठा संघर्ष केला. पोलिसांची चांगलाच दमछाक झाला. प्रतिकात्मक दंगलखोरांनी दगडफेक केल्यानंतर पोलिस मात्र बॅकफुटवर दिसले. या दगडफेकीत प्रतिकात्मक दंगलखोर आरि पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
विहिंपने दिला इशारा
युपी पोलिसांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) प्रयाग महानगरचे महामंत्री अमित पाठक यांनी केला आहे. सत्तधारी समाजवादी पक्षाचे हे कारस्थान दिसन आहे. समाजवादी पक्षानेच पोलिसांना हे कृत्य करण्यास भाग पाडले असावे, असेही पाठक यांनी म्हटले आहे. परंतु, आता विहिंप शांत बसणार नाही. अलाहाबादचे एसएसपी के. एस. इमेनुएल यांच्यावर कारवाई करण्‍याची मागणी पाठक यांनी केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, युपी पोलिसांच्या मॉक ड्रिलचे इतर फोटो...