आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahara Expresses Inability To Pay 36000 Crore In 18 Months

18 महिन्यांत 36 हजार कोटी देणे अशक्य, रॉय यांचे सुप्रीम कोर्टासमोर \'हात वर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: सुब्रतो रॉय. - Divya Marathi
फाइल फोटो: सुब्रतो रॉय.
नवी दिल्ली - सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टात पैसे परत करण्याच्या मुद्यावरून हात वर केले. 18 महिन्यांत 36 हजार कोटी परत करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. जगातील कोणतेही बिझनेस हाऊस एवढ्या कमी कालावधीत एवढी मोठी रक्कम परत करू शकत नाही, असे त्यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर ही रक्कम तर परत करावीच लागेल, असे कोर्टाने स्पष्ट केले. तेव्हा रक्कम परत करण्याबाबत काहीही दुमत नसल्याचे सहाराचे वकील कपिल सिब्बल म्हणाले.

गोरखपूरची मालमत्ता विकणार
सुब्रतो रॉय यांना जामीन मिळावा म्हणून 36 हजार कोटी रुपये जमवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाराने यासाठी मालमत्ता विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सहाराच्या वतीने मंगळवारी कोर्टाला सांगण्यात आले की, कंपनीला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात असलेली 44 एकरातील मालमत्ता विकून 110 कोटी रुपये जमवायचे आहेत. कंपनीने याबाबत कोर्टाकडे परवानगी मागितली आहे.

रक्कम जमा करणे गरजेचे
सुप्रीम कोर्टाने 19 जूनला सुब्रतो रॉय यांना जामीन मंजूर करताना ही अट घातली होती की, त्यांना सुटकेसाठी 5 हजार कोटींची रक्कम बँक गॅरंटी आणि 5 हजार कोटी कॅश जमा करावे लागतील. तसेच सुटकेनंतर 18 महिन्यांत 9 हप्त्यांमध्ये 36000 कोटी जमा करावे लागतील. जामीनावर सुटका झाल्यानंतर सुब्रतो रॉय यांनी दर 15 दिवसांनी दिल्लीच्या टिळक मार्ग ठाण्यात हजेरी लावावी लागेल, अशीही अट घालण्यात आली आहे.