आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saharanpur Dispute Between Two Community Latest News In Marathi

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये दंगल, 3 ठार; परिसरात संचारबंदी लागू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारनपूर / मुरादाबाद- उत्तर प्रदेशात शनिवारी सहारनपूरमध्ये गुरूद्वारा तयार करण्यावरून दंगल पेटली. दगडफेक व आग लावण्याच्या घटनांत 3 जणांचा मृत्यू तर 17 जखमी झाले. हिंसाचारानंतर सहारनपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. संतप्त जमावाने 30 दुकाने व 40 वाहने पेटवली. परिसरात तणाव आहे.

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली. त्यांना केंद्राकडून सर्व सहकार्य केले जाईल, असा विश्वास दिला. प्रमुख सचिव राकेश बहादूर यांनी सर्व अधिकार्‍यांशी आणीबाणीची बैठक बोलावून चर्चा केली. सहारनपूरच्या कुतूबशेर भागात गुरुद्वाराच्या जमिनीवरून शुक्रवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजल्यापासून संघर्षाला सुरुवात झाली. शीख समुदायाने सदर जमिनीवर गुरुद्वाराचे बांधकाम करण्यास सुरूवात केली. त्यावेळी मुस्लिम गटाने विरोध केला. त्यानंतर धुमश्चक्री उडाली. दोन्ही गटांना रोखण्यासाठी पोलिसांनी रबराच्या गोळ्या झाडल्या.

त्यानंतर संतप्त जमावाने तीसहून अधिक दुकाने, पेट्रोल पंप आणि खासगी बससह 40 हुन अधिक वाहने पेटवून देण्यात आली. तणावपूर्ण परिस्थिती असली तरी नियंत्रणाखाली आहे, असे पोलिस अधीक्षक राजेश पांडे यांनी सांगितले. संघर्षात व्यापारी नेते हरीश कोचर व अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यात एक पोलिसही गंभीर जखमी झाला आहे.
सहारनपूर येथे दंगलखोरांनी तुफान दगडफेक केल्यानंतर एका दंगलखोराला उचलून घेऊन जाताना पोलिस.
मंदिरात लाऊडस्पीकर लावण्यास हायकोर्टाने परवानगी नाकारली अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्राचीन शिवमंदिरामध्ये ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी नाकारली आहे. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे आदेशही बजावले आहेत. प्रशासनाने मंदिरात सकाळ-सायंकाळ एक तास ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली होती. त्यामुळे यासंबंधीचा निर्णय जिल्हा प्रशासनावर सोडण्यात आला आहे. प्रशासनाने घातलेल्या बंदीवरून 4 जुलै रोजी भाजप व पोलिस यांच्यात संघर्ष उडाला होता.

सहारनपूर येथे आग लावण्याच्या घटनांत 3 जणांचा मृत्यू, तर 17 जखमी झाले. हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. संतप्त जमावाने 30 दुकाने जाळली
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सुडाचे राजकारण करू नका - राहुल गांधी