आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saharanpur Dispute Between Two Minority Community Disturbance Continue

सहारणपूर हिंसा : ड्रोनद्वारे पोलिसांची निगराणी, दुपारनंतर कर्फ्यू हटण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - गोंधळानंतर आंदोलकांना घेऊन जाणारे पोलिस

मेरठ/सहारणपूर - पश्चिम उत्तर प्रदेशच्या सहारणपूरमध्ये धार्मिक स्थळावरून झालेल्या हिंसेनंतर परिसरातील तणावाची परिस्थिती कायम आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ड्रोनद्वारे (मानवरहित छोटे विमान) परिसरावर नजर ठेवून आहेत. शहराच्या सहा भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. या प्रकरणी 24 जणांना अटक करण्यात आली आहे. तणावाची परिस्थिती पाहता, शाळा-महाविद्यालयांना 30 जुलैपर्यंत सुटी देण्यात आली आहे.
अधिका-यांच्या मते जर परिसरात शांतता कायम राहिल्यास, दुपारनंतर कर्फ्यू हटवला जावू शकतो. वादग्रस्त जागेवर धार्मिक स्थळ तयार केल्यानंतर झा लेल्या हिंसेनंतर तीन जणांचा मृत्यू झाला होता. दोन्ही बाजुंनी करण्यात आलेली दगडफेक आणि गोळीबारात दोव डझनापेक्षा अधिक जखमी झाले होते. जखमींमध्ये दोन पोलिस कर्मचा-यांचाही समावेश आहे.

ड्रोनचा वापर
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहारणपूरमध्ये पोलिस ड्रोनद्वारे नजर ठेवून आहेत. पोलिस महासंचालक आलोक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी रस्ते एवढे अडचणीचे आहेत की, पोलिसांना गस्त घालणेही शक्य नाही. त्याचा फायदा दंगलखोर घेऊ शकतात. त्यामुळे अशा भागावर ड्रोनच्या मदतीने नजर ठेवली जात आहे.

कर्फ्यू हटवण्याचा विचार करणार
सहारणपूरच्या जिल्हाधिकारी संध्या तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी एक समिती परिस्थितीचा आढावा घेईल. त्यानंतरच कर्फ्यू हटवण्यासंदर्भात विचार केला जाणार आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणात असून कोठेही हिंसाचाराचे वृत्त नाही. मेरठ विभागात पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात आहेत. शनिवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली होती. यादव यांनी मृतांच्या वारसाला 10 लाख आणि जखमींना 50 हजारांच्या मदतीची घोषणा केली आहे.
नियंत्रण कक्षाची स्थापना
जिल्हाधिका-यांच्या मते, काही असामाजिक तत्वांच्या कृत्यामुळे शहरात स्थिती तणावाची निर्माण झाली आहे. सहारणपूरला सहा विभागांत विभागणी करून त्यानुसार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.