आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saharanpur Riot News In Marathi, BJP, Uttar Pradesh Government, Divya Marathi

सहारनपूर दंगलीप्रकरणी भाजप खासदारावर ठपका, राज्याने अहवाल पाठवला केंद्र सरकारकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील जातीय दंगलीप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या पाचसदस्यीय चौकशी समितीने भाजपच्या एका खासदारावर ठपका ठेवला आहे. राज्य सरकारने हा अहवाल केंद्र सरकारकडे दिला आहे.

सहारनपूर येथे झालेल्या जातीय दंगलीत तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दंगलीप्रकरणी राज्य सरकारने मंत्री शिवपाल यादव यांच्यासह पाच सदस्यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने रविवारी अहवाल सरकारला सादर केला. भाजपने हा अहवाल फेटाळत समाजवादी पक्ष राजकारण करत असल्याचे म्हटले आहे. या दंगलीमागे भाजपच्या स्थानिक खासदाराचे नाव असल्याचे अहवालावरून उघड झाले आहे. राघव लखन असे या खासदाराचे नाव आहे, असे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस नरेश अग्रवाल यांनी सांगितले.

पाचसदस्यीय समितीमध्ये अध्यक्षस्थानी शिवपाल आहेत. तंत्रज्ञान मंत्री शिवकांत ओझा, ग्रामीण विकास मंत्री अरविंदसिंग गोपे, सपाचे नेते अशू मलिक, हाजी इक्रम कुरेशी हे सदस्य आहेत. ही समिती मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्थापन केली होती.

दंगलीमागे सपा-भाजपचा होता हात : मायावती

राज्यातील स्थिती बिकट
उत्तर प्रदेशातील स्थिती अत्यंत वाईट आहे. समाजवादी पार्टीमुळे राज्याची स्थिती अशी बनत चालली आहे. सहारनपूर दंगलीचा अहवाल काहीही असला तरी आम्हाला मान्य नाही. कारण ही दंगल मुळातच भाजप-सपाचे कृत्य आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जातीय हिंसाचार घडवल्याचा आरोप बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. सपाने सत्ता हाती घेतल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.

अधिका-यांवर देखील ठपका
समितीने काही अधिका-यांवरही ठपका ठेवला आहे. हे सर्व अधिकारी खासदारांच्या म्हणण्यानुसार कृती करत होते. घटना घडल्यानंतर प्रशासनाने हालचाली करण्यास सुरुवात केली, असा आरोप ठेवण्यात आला आहे. वास्तविक अधिका-यांनी घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कडक कारवाई करून नोकरशहाला योग्य तो संदेश देणे महत्त्वाचे आहे, असे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय चिटणीस नरेश अगरवाल यांनी म्हटले आहे.

विरोधाभास आणि ‘ब्लेम गेम ’
अहवालात एकीकडे प्रशासकीय अपयशाचा ठपका दिसतो. दुसरीकडे घटनेला भाजप जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. म्हणूनच हा अहवाल सरकारकडून आलेला नाही. समाजवादी पार्टीचा अहवाल आहे. ब्लेम गेम खेळताना राजकीय फायदा उचलण्याचा सपाचा डाव आहे. सपाकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाही करता येणार नाही, असे भाजपचे प्रवक्ते विजयबहादूर पाठक यांचे म्हणणे आहे.