आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saharanpur Riots Investigation Report Cm Akhilesh Yadav

सहारनपूर दंगल : चौकशी समितीने भाजप खासदार, पोलिस प्रशासनाला ठरविले दोषी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ/सहारनपूर (उत्तर प्रदेश) - सहारनपूर दंगलीच्या तपासासाठी नेमलेल्या चौकशी समितीने स्थानिक पोलिस प्रशासन, भाजप खासदार राघव लखनपाल आणि काँग्रेसचे नेते राहिलेले मुहर्रम अली पप्पू यांना दोषी ठरविले आहे. तर, काँग्रेस नेते इम्रान मसूद यांना क्लिन चिट दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना अहवाल सादर केला आहे. यात सहारनपूर येथील प्रशासकीय अधिकार्‍यांनी आपापली जबाबदारी ओळखून काम केले असते तर, हिंसा टाळता आली असती, असे म्हटले आहे.
चौकशी समितीच्या अहवालानुसार, भाजप खासदारांची भूमिका दंगल भडकवण्यास पुरक होती. तर, भाजपने सहारनपूर हिंसेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे, की दंगलीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच जबाबदार आहे. सहारनपूरमध्ये 26 जुलै रोजी झालेल्या जातीय दंगलीत तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि 20 जण जखमी झाले होते. त्याशिवाय लाखोच्या संपत्तीचे नुकसान झाले होते.
काय आहे अहवालात
अहवालानुसार, स्थानिक पोलिसांना सहारनपूर येथील तणावाची आधीपासूनच माहिती होती, मात्र तरीही त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला नाही. समाजवादी पक्षाचे महासचिव नरेश अग्रवाल यांनी अहवालाच्या हवाल्याने म्हटले आहे, की दंगलींसाठी पोलिस अधिकारीच जबाबदार आहे. ही जातिय दंगल नसून पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेली हिंसा आहे. त्यांनी दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाईची मागणी केली आहे.
भाजप खासदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
चौकशी समितीने भाजप खासदार राघव लखनपाल यांना दोषी ठरविले आहे. त्यांनी शहरातून रॅली काढली आणि दंगलखोरांना चिथावणी दिली. त्यांच्या चिथावणीनंतरच दुकाने जाळण्याचा प्रयत्न झाला होता.