आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : गावकऱ्यांचा दावा, चुकून पाकमध्ये गेलेली गीता एका मुलाची आई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात पोहोचलेली गीता - Divya Marathi
पाकिस्तानात पोहोचलेली गीता
सहरसा (बिहार) - चुकून सीमेपार पाकिस्तानात गेलेली भारतीय मुलगी गीता भारतात परतणार असल्याच्या वृत्ताने तिचे गावकरी आनंदीत आहेत. ऐकायला आणि बोलण्यास सक्षम नसलेली गीता बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सिमरी बुख्तियारपूर परिसरातील कबीरा ढाप गावातील रहिवाशी आहे. गावकऱ्यांचा दावा आहे की गीताचे लग्न झाले असून तिला एक मुलगा देखील आहे. तिचे खरे नाव हीरामणि आहे. पाकिस्तानात तिचे संगोपण करणाऱ्या ईदी फाउंडेशनच्या बिलकिस ईदी यांनी तिला गीता हे नाव दिले होते.
कुटुंबिय पाहात आहे अतूरतेने वाट
गीताचे काका म्हणाले, 'ती सुरक्षीत घरी परत यावी, याची आम्ही वाट पाहात आहोत.' तिच्या भावांनी गीता घरी परत येण्यासाठी भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद दिले आहेत. त्यासोबतच एवढी वर्षे पाकिस्तानात तिचा सांभाळ केलेल्या फाउंडेशनचेही त्यांनी आभार व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गीताला मायदेशी परत आणण्याची माहिती दिली होती. डीएनए टेस्टनंतर तिला कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे स्वराज यांनी सांगितले होते.

काय म्हणाले गावकरी
गावकरी म्हणाले, 'गीता शांतीदेवी आणि जनार्दन उर्फ जयनंदन महतोंची मुलगी आहे. जनार्दन मोलमजूरीसाठी पंजाबात गेला होता. जालंधरमधील करतारपूर येथून गीता बेपत्ता झाली होती.'

गीताचे लग्न झालेले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. जनार्दनने गावातील उमेश महतोसोबत तिचे लग्न लावून दिले होते. तेव्हा ती 12 वर्षांची होती. तिचा पती उमेशही सासऱ्या प्रमाणे पंजाबात मोलमजूरी करत होता.

एका गावकऱ्याने नाव उघडन न करण्याच्या अटीवर सांगितले, उमेश आणि गीता यांना संतोष नावाचा एक मुलगा आहे. तो आता 12 वर्षांचा आहे. मात्र, गीताचा पती उमेश आणि मुलगा कुठे आहे याची अद्याप माहिती नाही.

आतापर्यंत माहित असलेली कथा
गीताबद्दल अशी माहिती पुढे आली होती, की 12-13 वर्षांची असताना गीता समझौता एक्स्प्रेसमधून लाहोरला पोहोचली होती. पाकिस्तानी पोलसिांनी तिला लाहोरच्या अनाथाश्रमात पोहोचवले. त्यानतंर तिची कित्येक अनाथाश्रमात रवानगी होत राहीली. अखेर ईदी फाउंडेशनमध्ये ती पोहोचली.
जवळपास 14 वर्षांपासून गीता पाकिस्तानात आहे. पाकिस्तानातील मदर ऑफ पाकिस्तान नावाने प्रसिद्ध बिलकिस ईदी यांनी तिचे नाव गीता ठेवले.

भारतातील गीताचे वकील मोमिन मलिक यांनी dainikbhaskar.com ला सांगितले, 18 फेब्रुवारी 2007 रोजी पानीपतमध्ये समझौता एक्स्प्रेसमध्ये ब्लास्ट झाला होता. या दुर्घटनेत जे लोक मारले गेले त्यांची केस लढत होतो. या ब्लास्टमध्ये पाकिस्तानातील कित्येक लोक मारले गेले होते. ही केस लढत असताना पाकिस्तानात येणे-जाणे सुरु होते तेव्हाच गीताबद्दल माहिती मिळाली. मलिक यांच्याकडे 2009 पासून मल्टिपल व्हिजा आहे.

अॅड. मलिक म्हणाले, पाकिस्तानचे सामाजिक कार्यकर्ते अंसार बर्नी यांनी मला एक भारतीय मुलगी येथील सामाजिक संस्थेत असल्याचे 22 ऑक्टोबर 2012 ला बर्नींसोबत भारतात एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली तेव्हा प्रथम गीताचे प्रकरण भारतीय माध्यमातून देशापुढे आले होते. त्यावेळी पंजाबातील एच.एस पवार हे सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेनंतर आम्ही गीताबद्दल माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षिस जाहिर केले होते. तिच्यासंबंधी पाकिस्तान हायकमिश्नरला पत्र देखील लिहिले होते. 7 जानेवारी 2015 ला पाकिस्तान हायकमिश्नरची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर तिची स्टोरी टाकली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा 'बजरंगी भाईजान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाच कुटुंबांनी संपर्क केला होता.

माध्यमांमध्ये गीताच्या बातम्या आल्यानंतर भारत सरकारने तिला भारतात आणण्यासाठी पुढाकार घेतला. परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशावरुन भारतीय हायकमिशनचे अधिकारी तिला भेटण्यासाठी इस्लामाबादला गेले होते.
सलमान खानने देखील गीताला तिच्या कुटुंबियांना भेटवण्याचे आश्वासन दिले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गीताचे अधिक फोटोज्