आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saheed Manpreet Singh Died In Jammu Terrorist Attack

शहीद मुलाला आईने दिला खांदा, रडताना डोळ्यात अश्रू ऐवजी दिसला अभिमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: शहीद मनप्रीत सिंहला खांदा देताना त्यांची आई)

धारीवाल - मुलाला आलेल्या वीर मरणावर आई रडली, तर तिच्या डोळ्यातून अश्रूंऐवजी अभिमान झळकला. मातृभूमीसाठी आपला काळजाचा तुकडा देणाऱ्या या आईचे पाय मुलाच्या अंत्ययात्रेला खांदा देताना जरासुध्दा लटपटले नाहीत. ही कदाचित देशातील पहिली वेळ असेल जेव्हा, एखाद्या आईने आपल्या मुलाच्या अंत्ययात्रेला खांदा दिला आहे. कश्मीरच्या उडीमध्ये शहीद झालेल्या मनप्रित सिंह यांच्यावर रविवारी धारीवाल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
'अजून दोन मुले, देशावर संकट आले तर हे सुध्दा शहीद होण्यास आहेत तयार'
तीन मुलांना सैन्यात पाठवणारी सुथबीर कौर म्हणाल्या की, "मला नक्कीच माझ्या मुलाच्या मृत्यूचे दुःख आहे, मात्र त्याच्या वीरमरणामुळे माझी मान उंचावली आहे. माझे अजून दोन मुले सैन्यातच आहेत. जेव्हा माझे पती मला सोडून गेले तेव्हा मनप्रित एका वर्षाचा होता. तो ऑगस्ट 2002 मध्ये सैन्यात भरती झाला. आज त्याला वीरमरणाने पुन्हा एकदा सिध्द झाले आहे की, पंजाबच्या मातीचा तो खरा पुत्र होता. अत्यंत गंभीर जखमी असतानाही आपल्या 20 साथीदारांना वाचवण्यासाठी मनप्रीतने बलिदान दिले आहे. देशावर संकट आल्यावर माझे इतर दोन्ही मुलेही वीरमरणासाठी तयार असतील."'

पुढील स्लाईडवर पाहा, शासकीय इतमामात शहीदाला दिली श्रध्दांजली...