आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिजाब घालणारी सईदा झाली व्यावसायिक वैमानिक, आता चालवणार एअरबस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- आकांक्षांपुढे गगनही ठेंगणे असे म्हणतात,त्याचा पुरेपूर प्रत्यय हैदराबादच्या सईदाचे उदाहरण पाहिल्यावर येतो. साधारण एका दशकापूर्वी तिने एका कार्यक्रमात ठामपणे आणि विश्वासाने सांगितले होते की, होय, मी वैमानिकच बनणार. बेकरीत काम करणाऱ्या एका माणसाच्या मुलीचे हे आत्मविश्वासपूर्ण उद््गार कोणलाही त्याव ेळी विश्वसनीय वाटले नव्हते. पण म्हणतात ना, जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो. 


हिजाब घालणारी सईदा सलवा फातिमा ही आता लवकरच हवाई क्षेत्रात प्रवेश करणार असून व्यावसायिक वैमानिक परवाना बाळगणाऱ्या भारतातील चार मुस्लिम महिलांपैकी ती एक आहे. न्यूझीलंडमध्ये तिने मल्टी इंजिन ट्रेनिंग घेतलेले असून बहारिनमध्येही  या क्षेत्रात तिने मानांकन प्राप्त केले आहे. नागरी पर्यटन महासंचालकांकडून परवानगी मिळाली की, ती एअरबस ३२० हे विमान चालवू शकेल. पण जीवनातील ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिला अनेक अडथळे पार करावे लागले.


विदेशात प्रशिक्षण
- तिने न्यूझीलंडमध्ये १५ तास मल्टी इंजिन विमान उडवले.
- बहारिन देशातील गल्फ एव्हिएशन अॅकॅडमीमध्ये टाइप रेटिंग प्रशिक्षण घेतले.
- याशिवाय ५२ तासांचे मल्टिफंक्शन डिस्प्ले ट्रेनिंग तसेच ६२ तासांचे मोशन सिम्युलेटर ट्रेनिंग घेतले. या प्रशिक्षणात प्रत्यक्ष विमान चालवण्याचा फील असतो.


असे अडथळे पार केले
- इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेच्या कोचिंग क्लासमध्ये तिला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने आपल्याला वैमानिक बनायचे आहे, असे आत्मविश्वासाने सांगितले.
- सियासतचे संपादक झाहिद अली यांनी सर्व मित्रांसमोर आणि विदुषींसमोर हा प्रश्न विचारला होता. त्यानी सईदाला तिच्या स्वप्नपूर्तीसाठी मार्गदर्शन केले आणि २००७ मध्ये आंध्र प्रदेश पर्यटन अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला.
- नेव्हिगेशन परीक्षेत मी तीन वेळा नापास झाले पण झाहिद सरांनी मला प्रोत्साहन दिले, असे सईदा म्हणते.
- पाच वर्षांनंतर सईदाने शिक्षण पूर्ण केले. यात सेसना १५२ विमान उडवण्याचा तिचा २०० तासांचा अनुभव आहे, तर १२३ तास तिने एकट्याने उड्डाण करण्याचा अनुभव घेतला आहे.


पर्यटन असो किंवा कोणतेही क्षेत्र असो, शिक्षण आणि क्षमताच शेवटी तुम्हाला मदत करते. तुम्ही यासाठी सक्षम आहात हे सिद्ध करावे लागते 
- सईदा सलवा फातिमा

बातम्या आणखी आहेत...