आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतोडी रियासतचा 10वा नवाब आहे सैफ अली खान, पाहा पतोडी पॅलेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतोडी नवाबाच्या राज्याभिषेकावेळी सैफ अली आणि त्याची आई शर्मिला टागोर - Divya Marathi
पतोडी नवाबाच्या राज्याभिषेकावेळी सैफ अली आणि त्याची आई शर्मिला टागोर
बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोरचा 8 डिसेंबर हा जन्मदिन आहे. या निमीत्ताने divyamarathi.com पतोडीमधील त्यांच्या पॅलेसबद्दल आणि 10 व्या नवाबाबद्दल तुम्हाला सांगत आहे.
गुडगाव - हरियाणाच्या गुडगावपासून 26 किलोमीटरवर अरावली डोंगरावर पतोडी रियासतीचा 200 वर्षांचा इतिहास वास करतो. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पतोडी संस्थानचे 9 वे नवाब मंसूर अली खान उर्फ टायगर यांच्या मृत्यूनंतर 2011 मध्ये त्यांचा मुलगा सैफ अली खान येथील 10 वा नवाब झाला होता. पतोडी संस्थानची स्थापना 1804 मध्ये झाली, याचे पहिले नवाब होते फैज तलब खान.

मुगलांकडून बक्षिसात मिळाली होती दिल्ली आणि राजस्थानमधील जमीन
सैफ अली खानचे पूर्वज सलामत खान 1408 मध्ये अफगाणिस्तानातून भारतात आले होते. सलामत यांचे नातू अल्फ खान यांनी कित्येक लढायांमध्ये मुगलांना साथ दिली होती. त्याची बक्षिसी म्हणून अल्फ खान यांना राजस्थान आणि दिल्लीमध्ये जमीन देण्यात आली होती. 1917 ते 1952 मध्ये इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी हे पतोडी संस्थानचे आठवे नवाब होते. इफ्तिखार अली क्रिकेटचे चाहते आणि चांगले क्रिकेटर देखिल होते. सुरुवातीला ते इंग्लंड टीमकडून खेळत होते नंतर ते भारतीय संघाचे कर्णधार झाले.

इफ्तिखार यांच्या मृत्यूनंतर पतोडी संस्थानचे 9 वे नवाब त्यांचा मुलगा मंसूर अली उर्फ टायगर झाले. ते भारतीय क्रिकेटचे कर्णधार देखिल होते. सप्टेंबर 2011 मध्ये फुफ्फुसाच्या आजाराने त्यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर टायगर पतोडी आणि शर्मिला टागोर यांचे चिरंजिव सैफ अली खान 10 वे नवाब झाले.

महाल परिसरताच कबर
नवाब परिवाराचा पतोडी पॅलेस नावाने महाल आहे. मंसूर अली उर्फ नवाब पतोडी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा दफनविधी महाल परिसरातच करण्यात आला. त्यांच्या इतर पुर्वजांची कबर देखिल येथेच आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पतोडी पॅलेस आणि फॅमिली फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...