आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan Creates Drama At Lucknow International Airport

लखनौ विमानतळावर सैफचा राडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- नवाब ऑफ पतौडी सैफ अली खानने लखनौ विमानतळावर व्‍हीव्‍हीआयपी लाऊंजमध्‍ये बसण्‍यासाठी गोंधळ घातला. वाद वाढल्‍यानंतर तो अखेर शेड्यूल होल्डिंग परिसरात गेला आणि काही वेळाने विमानाने दिल्‍लीला रवाना झाला.

सैफ अली खान 'बुलेट राजा' चित्रपटाच्‍या शुटींगसाठी लखनौ आणि बाराबांकी येथे आला होता. शुटींगनंतर तो दिल्‍लीला जाणार होता. लखनौच्‍या विमानतळावर काही वेळ फेरफटका मारल्‍यानंतर तो व्‍हीव्‍हीआयपी लाऊंजमध्‍ये टीमच्‍या सदस्‍यांसह जाऊन बसला. विमानतळ व्‍यवस्‍थापकाने सैफच्‍या सचिवाला सांगितले की, व्‍हीव्‍हीआयपी लाऊंजचा वापर भारत सरकारकडून अधिकृत अतिविशिष्‍ट व्‍यक्तीच करु शकतात. सैफला तिथे बसायचे असेल तर 1-2 जणांसोबत बसू शकतो. परंतु, तेदेखील नियमांच्‍या विरुद्ध आहे.

हे सर्व सांगून व्‍यवस्‍थापकाने इतर सदस्‍यांना बाहेर जाण्‍याची विनंती केली. परंतु, सैफ आणि त्‍याचे सहकारी व्‍यवस्‍थापकाशी वाद घालू लागले. विमानतळाच्‍या इतर अधिका-यांनी मध्‍यस्‍थी करुन वाद मिटविला. परंतु, सैफ नाराज होऊन निघून गेला.

फोटोः 'बुलेट राजा' चित्रपटाच्‍या शुटींगचे एक छायाचित्र.