आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan Is The 10th Nawab Of Pataudi Haryana

B'day: पतौडी संस्थानाचे 9 वे नवाब होते 'टायगर', आता सैफकडे आहे गादी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुड़गाव - भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि टायगर नावाने प्रसिद्ध असलेले मन्सूर अली खान यांचा जन्म 5 जानेवारी 1941 ला झाला होता. मन्सूर अली पतौडी संस्थानाचे 9 वे नवाब होते. त्यांच्या मृत्यूनंतर 2011 मध्ये त्यांचा मुलगा सैफ अली खान येथील 10 वा नवाब बनला. पतौडी संस्थानाची स्थापना 1804 मध्ये झाली होती. त्याचे पहिले नवाब फैज तलब खान हे होते. हीच पतौडी यांच्या नवाबांची सुरुवात मानली जाते.
मोगलांकडून बक्षीस म्हणून मिळाल्या होत्या जमिनी
सैफ अली खानचे पूर्वज सलामत खान 1408 मध्ये अफगाणिस्तानातून भारतात आले होते. सलामत यांचे नातू अल्फ खान यांनी मोगलांसोबत अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळेच अल्फ खान यांना राजस्थान आणि दिल्लीत बक्षीसरुपात जमिनी मिळाल्या होत्या. 1804 मध्ये पतौडी संस्थानाची स्थापना झाली. त्याचे पहिले नवाब बनले फैज तलब खान। ते 1804 ते 1829 या संस्थानाचे नवाब होते. त्यानंतर दुसरे नवाब अकबर अली सिद्दकी खान यांनी गादी सांभाळली. ते 1829 ते 1862 पर्यंत नवाब होते. त्याचप्रमाणे 1862 ते 1867 पर्यंत मोहम्मद अली ताकी सिद्दकी खान हे तिसरे, 1867 ते 1878 मोहम्मद मोख्तार सिद्दकी खान हे चौथे, 1878 ते 1898 मोहम्मद मुमताज सिद्दकी खान हे पाचवे, 1898 ते 1913 मोहम्मद मुजफ्फर सिद्दकी खान सहावे, 1913 ते 1917 तक मोहम्मद इब्राहिम सिद्दकी खान सातवे आणि 1917 से 1952 इफ्तिखार अली हुसैन सिद्दकी आठवे नवाब बनले. इफ्तिखार अली प्रसिद्ध क्रिकेटपटूही होते. ते आधी भारतीय संघाचे कर्णधार होते आणि नंतर भारतीय संघाचे कर्णधार बनले.

1952 मध्ये इफ्तिखार अली खान पतौडी यांचे दिल्लीत पोलो खेळताना निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर मन्सूर अली उर्फ टायगर नववे नवाब बनले. त्यांनाही वडिलांप्रमाणे क्रिकेटची आवड होती. त्यामुळे ते खेळाच्या जोरावर भारतीय संघाचे कर्णधार बनले. सप्टेंबर 2011 मध्ये त्यांचे निधन झाले. पतौडी 1952 पासून 1971 पर्यंत नवाब होते. 1971 मध्ये भारत सरकारने संस्थाने खालसा केली होती. पण तरीही वडिलांच्या मृत्यूनंतर सैफ अली खानला 10 वा नवाब म्हणून गादी सोपवण्यात आली.

महालामध्ये आहे कबर
पतौडीमध्ये नवाब कुटुंबीयांचा पतौडी पॅलेस नावाचा महाल आहे. मन्सूर अली उर्फ नवाब पतौडी यांच्या मृत्यूनंतर महाल परिसरातच त्यांना दफन करण्यात आले. येथे त्यांच्या कबरजवळच त्यांचे आजी आजोबा आणि वडिलांची कबरही आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सैफ अली खान यांना नवाब बनवले त्यावेळचे फोटो..