उन्नाव - उत्तर प्रदेशच्या उन्नामध्ये गंगेमध्ये आढळून आलेले शेकडो मृतदेह गंगेच्या किना-यावरच दफन केल्यानंतर राजकारण आणखी तापले आहे. भाजप खासदार साक्षी महाराजांनी या प्रकरणी राज्यातील समाजवादी पार्टीच्या सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे केल्यानंतर मंत्री आजम खान यांनी गुरुवारी पलटवार केला. साक्षी महाराजांनीच ट्रकमध्ये भरून सर्व मृतदेह गंगेत आणून टाकले आणि सरकारची बदनामी करण्याचा कट रचला, असा आरोप त्यांनी केला.
मतृदेह आढळले त्याच्या जवळच किना-यावर गड्ड्यात मृतदेह दफन केल्यानंतर राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप साक्षी महाराजांनी केला होता. तसेच जिल्हा प्रशासनावरही त्यांनी आरोप केला होता. सरकारच्या दबावात जिल्हा प्रशासनाने सर्व मृतदेह याठिकाणी घाईघाईत पुरले. मृतदेहांचे शवविच्छेदन करून त्यानंतर विधीवत त्यांचे अंत्यससंस्कार करणे गरजेचे होते, असे साक्षी महाराज म्हणाले.
मृतदेह पुरल्याने वाद
भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी आणि जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल यांच्यात बुधवार खडाजंगी झाली. या प्रकरणाचा व्हिडिओही समोर आला आहे. (व्हिडिओ पाहा अखेरच्या स्लाइड्वर) रात्री 11 वाजता अंधारात मृतदेह पुरले जाण्याचे कारण काय? असा सवाल वाजपेयी यांनी अग्रवाल यांना केला. सकाळपर्यंत वाट पाहून शवविच्छेदनानंतर मृतदेह पुरायला हरकत काय? अशी विचारणाही त्यांनी केली.
केंद्राने अहवाल मागवला, मायावती यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी
केंद्र सरकारने या प्रकरणी राज्य सरकारकडून अहलाव मागवला आहे. मुख्य गृहसचिव देवाशिष पंडा यांनी उन्नावच्या जिल्हाधिकार्यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. पोलिस महानिरीक्षक सतीश गणेश यांनी या प्रकरणी केंद्राला अहवाल पाठवल्याचे म्हटले आहे. तर मायावती यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिक भयभीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गंगेच्या किना-यावर मृतदेह पुरल्याचे आणि तपासाचे PHOTO
अखेरच्या स्लाइड्वर पाहा, वाजपेयी आणि जिल्हाधिका-यांमध्ये झालेला वाद