आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरबाहेर टेन्शमध्ये दिसली साक्षी धोनी, अर्धा तास अशी पाहत होती वाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी दिवडी मंदिरात पोहोचली होती. - Divya Marathi
महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी दिवडी मंदिरात पोहोचली होती.
रांची - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी शनिवारी दिवडी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी दुपारचे 12 वाजलेले असल्याने महाआरतीमुळे दर्शन बंद होते. त्यामुळे साक्षी जवळपास अर्धा तास बाहेर उभी होती. त्याचवेळी तिला पाहण्यासाठी गर्दी जमा झाल्याने साक्षी काहीशी टेन्शमध्ये आली. तिला अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर पोलिसांनुी गर्दी हटवली. 
 
धोनी आवर्जुन लावतो हजेरी
साक्षी बरोबर आणखी तीन जणी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. महेंद्रसिंह धोनीही जेव्हा कधी त्याच्या गावी म्हणजे रांचीला येतो तेव्हा तो देवडी मंदिरात आवर्जुन हजेरी लावत असतो. साक्षीबरोबर लग्न केल्यानंतरही धोनी या मंदिरात आशिर्वाद घेण्यासाठी आला होता. धोनी त्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या मॅचपूर्वी याठिकाणी सोळाभुजी दुर्गा देवीच्या दिवडी मंदिरात आवर्जुन हजेरी लावत असतो. 

अनेक क्रिकेटपटुंनी घेतले आहे दर्शन 
- भारतीय क्रिकेट संघात निवड होण्याच्या आधीपासून धोनी याठिकाणी पुजा करायला येतो. इतरही अनेक मोठे खेळाडू याठिकाणी आलेले आहेत. 
- काही वर्षांपूर्वीपर्यंत या मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांनाच या मंदिराची माहिती होती. पण धोनी याठिकाणी नेहमी येत असल्याने हे मंदिर बरेच प्रसिद्ध झाले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS..  
फोटो : खग्रेंद्र महतो
 
बातम्या आणखी आहेत...