आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे खासदार साक्षी महाराजांचे बेताल वक्तव्य: आयोगाने अहवाल मागवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी मुस्लिम समुदायाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने मेरठ जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.

भाजप खासदाराच्या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ उडाली. त्या पार्श्वभूमीवर नियमानुसार जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना धार्मिक किंवा जातीच्या आधारे मते मागू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावले होते. परंतु साक्षी महाराजांचे वक्तव्य त्याचे उल्लंघन करत असल्याचा दावा करून शनिवारी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला, अशी माहिती मेरठचे जिल्हा पोलिस अधीक्षक जे. रविंद्र गौड यांनी दिली. सदर बाजार पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्या शिवाय काँग्रेसने देखील साक्षी महाराजांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, असे सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक तोंडावर असतानाच  शुक्रवारी साक्षी यांनी वादग्रस्त विधान केले होते.
 
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन : काँग्रेस
साक्षी महाराज यांचे वक्तव्य आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यात काहीच शंका नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केली आहे, असे काँग्रेस नेते के.सी. मित्तल यांनी म्हटले आहे. सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाने काही दिशानिर्देश दिले होते. आता हे त्याचे उल्लंघन करणारे वक्तव्य आहे, असा दावा जदयूचे नेते के.सी. त्यागी यांनी म्हटले आहे.

काय होते विधान ?
देशाची लोकसंख्या वाढत आहे. चार बायका आणि ४० मुले असलेले देशाच्या लोकसंख्या वाढीला कारणीभूत आहेत. हिंदू त्याला कारणीभूत नाहीत. त्यामुळेच हे राेखण्यासाठी कडक कायद्याची गरज आहे. जेणेकरून लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकेल. अशा मुद्द्यावर राजकारण करू नये. देशासाठी निर्णय घेतला पाहिजे, असे साक्षी यांनी म्हटले होते.
 
काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी...?
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की, साक्षी महाराजांच्या कथित वक्तव्याची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. अहवाल पाहिल्यानंतर महाराजांवर कारवाई करण्यात येईल. साक्षी महाराजांचे हे वैयक्तिक मत असू शकते. भाजप आणि भाजप सरकार अशा विचारसरणीचे नाही. 

पुढील स्लाइडवर वाचा,  साक्षी महाराजांच्या कथित वक्तव्यावरून विरोधकांना मिळाले आयते कोलीत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...