आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साक्षीला पैलवान करण्याच्या विरोधात होती आई, वडील आहेत कंडक्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - महिला रेसलर साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करुन केवळ भारताचे खाते उघडे नाही तर इतिहास रचला आहे. साक्षीने महिलांच्या फ्रीस्टाइल कुस्तीच्या 58 किलो वजनी गटात भारताला पदक मिळवून दिले आहे. रिओमधील भारताचे हे पहिले पदक आहे. भारतासाठी पदक जिंकणारी साक्षी पहिली महिला पैलवान झाली आहे.

वडील दिल्लीत कंडक्टर
> साक्षी सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील सुखबीर मलिक दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये (डीटीसी) कंडक्टरची नोकरी करतात.
> तर साक्षीची आई सुदेश मलिक या रोहतक येथे अंगणवाडी सुपरवाझर आहेत.
> मीडिया रिपोर्टनुसार, साक्षीने वयाच्या 12 व्या वर्षापासून रेसलिंगची सुरुवात केली होती.
> साक्षीने पैलवान होऊ नये अशी तिच्या आईची इच्छा होती. त्यांचे मत होते की पैलवानाची बुद्धीमत्ता कमी असते.
> साक्षीच्या कुटुंबात अखाड्याची परंपरा राहिलेली आहे. तिचे आजोबा पैलवान होते आणि ती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पैलवान झाली. नसुतीच पैलवान झाली नाही तर आता तिने जगात नाव कमावले आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा आणि पाहा, कशी करते प्रॅक्टिस
> कसा आहे साक्षीचा स्वभाव, कशी आहे पर्सनल लाइफ
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसा आहे साक्षीचा स्वभाव, कशी आहे पर्सनल लाइफ
बातम्या आणखी आहेत...