आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळविट शिकार प्रकरण: सलमान खान जोधपूर कोर्टात हजर, आरोपांचा केला इन्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - बहुचर्चित काळविट शिकार प्रकरणाच्या सुनावणीसाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान बुधवारी जोधपूर कोर्टात हजर झाला होता. त्याने मुख्य जिल्हा न्यायाधीशासमोर जबाब नोंदवला. आपल्या जबाबात सलमानने त्याच्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले, की आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याने काळविटाची शिकार केली नव्हती.
सलमानचा जबाब नोंदवल्यानंतर याप्रकरणाच्या पुढच्या सुनावणीसाठी कोर्टाने 10 मार्चची तारीख निश्चित केली आहे. या सुनावणीला 'हम साथ साथ है' या चित्रपटातील सलमानचे सहकलाकार सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम हजर होते.
बुधवारी सकाळी 11 वाजता सलमान खान कोर्टात हजर झाला होता. शिकारीसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे अवैध असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. जोधपूरच्या मुख्य जिल्हा न्यायाधिश चंद्रकला जैन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. मागील सुनावणी दरम्यान सलमानचा जबाब नोंदवण्यासाठी त्याला हजर करण्याचे आदेश कोर्टाने त्याचे वकील हस्तीमल सारस्वत यांना दिले होते.
1998 मध्ये 'हम साथ-साथ है' चित्रपटाच्या शुटींग दरम्यान झालेल्या काळविट शिकार प्रकरणी सलमान खानवर तीन प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. यातील दोन प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली असून एका प्रकरणाची सुनावणी बुधवारी होती.शिकारीसाठी सलमानने परवाना रद्द झालेल्या शस्त्रांचा वापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी लूणी पोलिस स्टेशनमध्ये वन अधिका-यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तत्कालिन पोलिस अधिकारी अशोक पाटनी यांनी केलेल्या तपासात सलमानने .32 रिव्हालव्हर आणि .22 रायफलचा शिकारीसाठी वापर केला होता. या दोन्ही शस्त्रांचा परवाना रद्द झालेला होता.

पुढील स्लाइडमध्ये कोण-कोणत्या प्रकणात अडकलेला आहे सलमान...