आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Film Jai Ho Owaisi Ask The Audience Not To Watch Film

मोदीप्रेमी सलमानचा \'जय हो\' चित्रपट पाहू नका- मुस्लिम नेते ओवेसींचे फर्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- बॉलिवूडचा दबंग व स्टार अभिनेता सलमान खान याने भाजप नेते नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने मजलीस-ए-मुसलमीन (एमआयएम)चे अध्यक्ष खासदार असादुद्दिन ओवेसी यांनी त्याचे चित्रपट पाहू नयेत असे फर्मान काढले आहे. सलमान खानचा बहुचर्चित व देशहितावर असलेला ‘जय हो’सह त्याचे इतर कोणतेही चित्रपट ख-या मुस्लिमांनी पाहू नयेत, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
अभिनेता सलमान खानने मकरसंक्रातीच्या दिवशी गुजरातचे मुख्मंत्री नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्याबरोबर पतंगबाजी केली होती. मोदींसोबत लंच घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सलमानने त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. यानंतर एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुजरात दंगलीबद्दल कोर्टाने मोदींना क्लिन चिट दिली असल्याने त्यांनी माफी का मागावी असे म्हटले होते. त्यामुळे मुस्लिम समाज व धर्माचे राजकारण करणा-या ओवेसींनी सलमानही मुस्लिमद्रोही असल्याचे म्हटले आहे.
सलमान खानचे चित्रपट थिल्लर चित्रपट असतात व त्याचे समाज मनावर वाईट परिणाम करतात. तो एक कलाकार आहे त्याच्याकडे एवढे लक्ष देण्याची गरज नाही असे सांगत ओवेसी व त्यांच्या पक्षाने सलमानच्या विरोधात रान पेटवण्यास सुरुवात केली आहे. सलमान खानसारख्या थिल्लर अभिनेत्याचा धांगडधिंगा पडद्यावर पाहण्याची गरज नाही, मुस्लिमांनी त्याच्या ‘जय हो’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन ओवेसी यांनी केले आहे.
भ्रष्ट राजकारणावर भाष्य करतोय जय हो, वाचा पुढे...