आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan Has To Be Appear In Court In 2002 Hit And Run Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानला कोर्टाचा दिलासा, गैरहजेरीस परवानगी, संजूसोबत घालवले पाच तास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत न्यूरेलजियाचा उपचार करीत असलेला बॉलिवूड स्टार सलमान खान 2002 मध्ये 'हिट एंड रन' प्रकरणी सोमवारी सत्र कोर्टात सुनावणी झाली. यात सलमान खानला दिलासा मिळाला असून, त्याला सुनावणीदरम्यान गैरहजर राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार आहे. सलमान रविवारी दुपारी भारतात परतला. त्यानंतर घरी गेल्यानंतर थोड्याच वेळात तो संजय दत्तच्या घरी गेला. तेथे तो तब्बल पाच तास थांबला. सलमान रविवारी सायंकाळी संजय दत्तच्या घरी गेला व रात्री 11 वाजता परत आला.

संजय दत्तला मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टाने 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी पाच वर्षांची तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, सलमान खानही तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. सलमानवर जर आरोप सिद्ध झाले तर त्यालाही दहा वर्षांपर्यंत जेलची हवा खावी लागू शकते.