आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन: सलमानला मिळालेल्या जामीनाला सुप्रीम कोर्टात आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाल्या नंतर हायकोर्टाने मंजूर केलेला अंतरिम जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी गुरुवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत आरोप करण्यात आला आहे, की हायकोर्टाने घाईगडबडीत निर्णय दिला आणि जामीन अर्जावर आऊट ऑफ टर्न सुनावणी करण्यात आली.
दुसरीकडे, जामीन अर्जावर शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीची सलमानच्या वकीलांनी तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी मुंबई हायकोर्टात सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. जर येथे त्याला जामीन मिळाला नाही तर वकिलांची फौज दिल्लीतही तयार राहाणार आहे. त्यांच्याकडे जामीन अर्जाची प्रत तयार राहील. हायकोर्टात अर्ज रद्द करण्यात आल्यानंतर ते सुप्रीम कोर्टात अर्ज सादर करतील. बुधवारी मुंबईत अशीच रणनीती आखण्यात आली होती. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे वकिलांची फौज घेऊन तयार होते, सेशन्स कोर्टाचा निर्यण आल्याबरोबर त्यांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज सादर केला होता.
शुक्रवारी हायकोर्टात काय निर्णय होणार
बुधवारी मुंबई सेशन्स कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली त्यानंतर काही मिनीटांतच त्याचे वकिल जामिनासाठी हायकोर्टात पोहोचले. निर्णयाची प्रत दिली नसल्याचे कारण सांगत हायकोर्टाने दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करुन शुक्रवारी जामीन अर्जावर सुनावणीसाठी तारीख दिली.
शुक्रवारी निर्णयाची प्रत मिळाली तर...
हायकोर्ट सलमानचे अपील स्विकारुन जामिनाचा कालावधी वाढवू शकते. त्यानंतर पुढील तारीख दिली जाईल, अर्थात सलमानला मोठा दिलासा मिळेल. मात्र जर हायकोर्टाने सलमानचा अर्ज फेटाळला तर त्याला समर्पण करावे लागेल.
जर शुक्रवारी निर्णयाची प्रत मिळाली नाही तर...
अशा परिस्थितीत हायकोर्ट निर्णयाची प्रत मिळेपर्यंत सलमानच्या जामिनाचा कालावधी वाढवू शकते, किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत आपला निर्णय सुरक्षीत ठेवू शकते. अन्यथा सलमानला सात जून नंतरची तारीख दिली जाईल, कारण 10 मे ते 7 जून दरम्यान हायकोर्टाला सुटी आहे.
सलमानला बुधवारी अंतरिम जामीन का मिळाला ?
सलमानला मिळालेला जामीन हा अंतरिम आहे. तो काही कायमचा जामीन नाही. या खटल्यातील न्यायनिर्णयाची प्रत बुधवारी मिळाली नाही. त्यामुळे हायकोर्टाने हा तात्पुरता जामीन दिला आहे. जजमेंटची प्रत शुक्रवारी जामिनावरील सुनावणीवेळी सादर करावी लागेल. त्या सुनावणीत सलमानच्या वकिलाला सलमान जामिनासाठी कसा पात्र आहे, त्याने खटल्याच्या काळात कशी वर्तणूक योग्य ठेवली होती. खालच्या कोर्टाचा निकाल कसा चुकीचा आहे, हे सलमानच्या वकिलास हायकोर्टात सिद्ध करावे लागणार आहे, त्यांना सिद्ध करता नाही आले, तर त्याचा जामीन शुक्रवारी हायकोर्ट रद्द करू शकते, असे सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये, ...तर सलमान जामिनावरच राहू शकतो