आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Went Delhi Without Toll Tax After Film Sultan Shooting

सलमानच्या खिशातून नाही निघाले 75 रुपये, टोल TAX न देताच गेला दिल्लीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोल नाक्यावर काही क्षणांसाठी उभी सलमानची मर्सिडिज. - Divya Marathi
टोल नाक्यावर काही क्षणांसाठी उभी सलमानची मर्सिडिज.
मेरठ - एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेणारा बॉलिवूड अभिनेता सलमान खानने टोल टॅक्सचे 75 रुपये न देताच आपली मर्सिडिज दिल्लीच्या दिशेने पळवली. ही घटना शुक्रवारी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 58 (एनएच-58)वर घडली. शुक्रवारी सायंकाळी साधारण पावणे सहाच्या दरम्यान सुलतानची शुटिंग संपवून सलमानच्या गाड्यांचा ताफा वेस्टर्न टोल प्लाझा येथे आला. त्याच्या ताफ्यात एक डझन गाड्या होत्या. स्वतः सलमान पांढऱ्या रंगाच्या मर्सिडिजमध्ये होता.

कोण-कोण होते सलमानसोबत
- सलमान खान सुलतान चित्रपटाच्या शुटिंगसाठी मेरठमध्ये आहे.
- शुक्रवारी चित्रपटाचे शुटिंग संपवून तो परतत होता. तेव्हा सिवाया टोल नाक्यावर त्याच्याकडून टोल वसूल केला गेला नाही.
- सलमान खानच्या गाड्यांच्या ताफ्याला मुजफ्फरनगरचे मुख्यकार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि पोलिस एस्कॉर्ट करत होते.
- त्यांच्या गाड्यांचा ताफा लेन क्रमांक 12 वर पोहोचल्यानंतर त्या लेनवरील गाड्यांना त्वरित सोडण्यात आले.

सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी मोकळा केला मार्ग
- सलमानच्या ताफ्यासोबतचे सुरक्षारक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी टोल नाक्यावरील लेन आधीच रिकामी करुन ठेवली होती.
- त्याच्या ताफ्यात एक डझन गाड्या होत्या मात्र एकानेही टोलचे पैसे दिले नाही.

ग्रे कलरच्या टी-शर्टमध्ये होता सलमान
- सलमान कारच्या समोरच्या सीटवर बसलेला होता. त्याने ग्रे कलरचा टी-शर्ट घातलेला होता.
- टोलनाक्यावर असलेल्या माध्यमांच्या फोटोग्राफर्सने त्याचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या ड्रायव्हरने हाताने इशार करुनच त्यांना नकार दिला.
- त्याचे सुरक्षा रक्षकही धावत आले आणि त्यांनी कारला वेढा टाकला. यामुळे तिथे काहीवेळ वाहतूकीची कोंडी देखील झाली.
- टोलनाक्यावर उभ्या असलेल्या लोकांना जेव्हा कळाले की कारमध्ये सलमान आहे तेव्हा त्यांनीही त्याला पाहाण्याचा प्रयत्न केला.

टोल प्लाझाचे अधिकारी काय म्हणाले
- टोल प्लाझाचे अधिकारी ब्रिजेश सिंह म्हणाले, या मार्गावरुन कोणी व्हीआयपी जाणार आहे, याची आम्हाला माहिती नव्हती.
- अचानक पोलिसांच्या गाड्या आल्या आणि वेगात गाड्यांचा ताफा निघून गेला.
- टोल तिकीट 75 रुपये आहे, मात्र कोणीही ते दिले नाही.
पुढील स्लाइडमध्ये, दुचाकी चालवताना मोडले वाहतूकीचे नियम