आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुर्शीद म्हणाले, मोदींसाठी नपुंसकपेक्षा चांगला शब्द नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नरेंद्र मोदींवरील टिप्पणीवरून भाजप संतप्त झाली आहे. काँग्रेसला पराभव डोळ्यासमोर दिसत असून त्यामुळे त्यांचा तोल ढळला असल्याचे भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
खुर्शीद यांची टिप्पणी नैतिकतेला धरून नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. खुर्शीद यांच्या वक्तव्याची आम्ही निंदा करतो. त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे. भाजपची ही मागणी खुर्शीद यांनी फेटाळली आहे.

ते म्हणाले, 'मी त्यांच्याबद्दल तोच शब्द वापरला आहे, जो आपल्या शब्दकोषात आहे. एक तर त्यांनी मान्य केले पाहिजे की, ते शक्तीशाली आहेत आणि गुजरातमध्ये ज्या दंगली झाल्या त्या जाणीवपूर्वक केल्या गेल्या. नाही तर, हे मान्य करावे की, दंगली थांबवण्याची आमच्यात क्षमता नव्हती. क्षमता नाही याला काय म्हणतात, नपुंसकच म्हणतात ना. तर मग त्यांना याचे एवढे का वाईट वाटत आहे. त्याला दुसरा पर्यायी शब्द असेल तर तो त्यांनी सांगावा मी तो स्विकारले. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला हा शब्द योग्य वाटला.'
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी फारुखाबाद या त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदींना 'नपुंसक' म्हटले आहे. गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीवरुन त्यांनी ही टीप्पणी केली आहे. दरम्यान, त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे वरिष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांनी खुर्शीद यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी केली आहे.
खुर्शीद यांनी मोदींवर शाब्दिक हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी मोदींना शेलकी विशेषणे वापरली आहेत. एकदा तर, त्यांनी मोदींना डबक्यातील बेडूक म्हटले होते.
मंगळवारी फारुखाबाद येथे खुर्शीद मोदींवर टीका करताना म्हणाले, 'पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहाणा-यांनी 2002 च्या दंगली दरम्यान दंगल आटोक्यात आणण्यासाठी काहीच केले नाही. आम्ही त्यांना (मोदींना) लोकांचा हत्यारा म्हणत नाही. मात्र, आमचा आरोप आहे, की ते नपुंसक आहेत. हत्या थांबवण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही.'
गुजरात दंगली प्रकरणी मोदींना क्लिनचिट मिळाल्याचा भाजप प्रचार करीत आहे, त्याचाही खुर्शीद यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, भाजप तथ्यहिन प्रचारतंत्र वापरत आहे. कोर्टाने म्हटले आहे, की त्यांच्याविरोधात ठोस पुरावे उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे त्यांना दोषी मानता येणार नाही. याचा अर्थ मोदी धुतल्या तांदळासारखे आहेत असा होत नाही.

पुढील स्लाइडमध्ये, मोदींवर केजरीवालांच्या भूमिकेने भाजप खुश