आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Speek In Court That He Is Innosent, They Involve Me False

सलमान खान कोर्टात म्हणाला- \'मी इंडियन, माझी आई हिंदु तर वडील मुसलमान\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- काळवीटाची शिकार आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीला बॉलीवूड अभिनेता सलमान खानने सर्व आरोप फेटाळले. पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्याला या प्रकरणात विनाकारण अडकवल्याचा दावा देखील सलमानने कोर्टात केला.

सुनावणीत कोर्टाने सलमानला त्याचा धर्म विचारण्यात आला. त्यावर सलामानने उत्तर दिले, 'मी भारतीय आहे'. कोर्ट म्हणाले, 'देशातील प्रत्येक नागरिक भारतीय असतो. तुझी नेमकी जात कोणती' असा प्रत‍िप्रश्न केला. त्यावर सलमान म्हणाला, 'माझी आई हिंदु तर वडील मुसलमान आहे. त्यामुळे माझा धर्म आणि जात 'भारतीय'च असल्याचे मी मानतो.'

मला अडकवले- सलमान
वनखात्याचे अधिकारी आणि पोलिसांनी आपल्याला या प्रकरणात अडकवले आहे. काळवीट शिकार आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरचा अापला काही संबंध नाही. आपण निर्दोष असून वन अधिकार्‍यांनीच आपल्याला फसवले असल्याचे सलमानने बुधावारी कोर्टात सांगितले.

जोधपूर कोर्टात बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सलमानची बहीण अलवीराही देखील उपस्थित होती. कोर्टात सलमान म्हणाला, काळवीट शिकारीचा आरोप खोटा आहे. पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्यावर खोटा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी आपली बाजु मांडण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे. सध्या कोर्टाने सलमानचा जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 मे रोजी होईल.

सलमानला गेल्या आठवड्यात कोर्टात हजार व्हायचे होते. परंतु, प्रकृती ठीक नसल्याचे कारण त्याने पुढे केले होते. दरम्यान, सलमान गेल्या आठवड्यात जम्‍मू-काश्‍मीरमध्ये सिनेमाचे शूटिंग करत होता.