जोधपूर - हिट अँड रन प्रकरणात
सलमान खानला आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सलमानला 10 वर्षांची शिक्षाही होऊ शकतो. सलमान या प्रकरणातून बाहेर पडला तरी अद्याप काळवीट शिकार प्रकरणाने त्याचा पिच्छा सोडलेला नाही.
जोधपूरमध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात सलमानने याआधीही तुरुंगवास भोगला आहे. ऑक्टोबर 1998 मध्ये सलमानची जोधपूर न्यायालयात रवानगी करण्यात आली होती. सलमान येथे कैदी क्रमांक 210 म्हणून राहिला होता. त्यावेळी त्याची त्यावेळची गर्लफ्रेंड कॅटरिना कैफसह त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य त्याला भेटायला तुरुंगात आले होते.
किती शिक्षा होण्याची शक्यता
काळवीट शिकार प्रकरणामध्ये
सलमान खानच्या विरोधात दोन वेगळ्या कलमांन्वये खटले सुरू आहेत. त्यानुसार
सलमान खानला किती शिक्षा होऊ शकते आणि त्याला पुढचा मार्ग काय असेल? हे जाणून घेऊयात.
तीन वर्षे
उच्च न्यायालयात अशा प्रकारच्या खटल्यांचे स्पेशालिस्ट असलेले वकील अशोक जोशी यांच्या मते फेब्रुवारीमध्ये
सलमान खानच्या विरोधात शस्त्रास्त्र कायदाप्रकरणी प्रामुख्याने दोन कलमान्वये सुनावणी झाली. त्याच्या विरोधात पहिले प्रकरण अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आर्म्स अॅक्टच्या कलम 3/25 अंतर्गत आहे. यात जास्तीत जास्त तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. पण याआधी अनेक प्रकरणांत आरोपींना केवळ दंड घेऊन सोडण्यातही आले आहे. त्यामुळे सलमानला किती शिक्षा होते याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. शिक्षा झाली तरी त्याला लगेच जामीन मिळून त्याला एका महिन्यात वरच्या कोर्टात दाद मागता येऊ शकते.
सात वर्षे
सलमानला विरोधात याच कायद्यातील कलम 25 अंतर्गतही शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. अवैध शस्त्र बाळगण्याबरोबरच त्याचा वापर केल्यास या कलमांतर्गत खटला चालवला जातो. जर हे सिद्ध झाले तर त्याला किमान तीन व जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण या प्रकरणी शिक्षा झाल्यास त्याला लगेचच जामीन मिळणार नाही. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा जोधपूर न्यायालयात जावे लागू शकते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जोधपूर तुरुंगाशी जुळलेल्या सलमानच्या कटू आठवणी...