आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salt Price Go Up In West Bengal, Bihar, North East

प.बंगाल,बिहार, ईशान्येकडील राज्यांत मिठाचे भाव गगनाला भिडले, अफवांचे परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/ कोलकाता - देशभरात कांदा, टोमॅटोचे भाव खाली येत असतानाच शुक्रवारी पश्चिम बंगाल, बिहार, ईशान्येकडील मेघालय, मिझोराम राज्यांमध्ये मिठाचे भाव गगनाला भिडले. मीठ संपल्याची आवई कुणीतरी उठवली अन् पाहता-पाहता संपूर्ण पूर्व भारतात मिठाचे भाव प्रतिकिलो दीडशे रुपयांपर्यंत उसळले. दुकानावर मीठ खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या.
अफवा पसरवणा-या आणि साठेबाजी करणा-या 15 लोकांना अटक केली असून बिहारमध्ये या प्रकरणी 21 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मिठाची कृत्रिम टंचाई निर्माण करून घबराट उडवण्यामागे या व्यापा-यांचा हेतू काय आहे याची चौकशी करण्यात येईल, असे बिहारचे प्रधान सचिव शिशिर सिन्हा यांनी सांगितले. बिहारमधून सुरू झालेले अफवांचे पेव पाहता-पाहता अख्ख्या पूर्व भारतात आणि नंतर मेघालय, मिझोराम या ईशान्येकडील राज्यांमध्येही पोहोचले. मेघालयमध्ये मीठ दीडशे रुपये किलोने विकण्यात येत होते तर दार्जिलिंगमध्ये हा दर 100 रुपये किलो होता.
2600 मेट्रिक टन बिहारमध्ये
बिहारमधील मरूफगांग डेपोत सुमारे 2600 मेट्रिक टन मीठ पोहोचले असून आणखी एक खेप येत असल्याच बिहारचे सहायक मीठ आयुक्त राजेश नाग यांनी सांगितले.