आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीच्या निर्णयावर मोदी यांनी क्षमा मागितल्यास त्यांना सलाम : कमल हासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणे ही माझी चूक होती. त्याबद्दल मी माफी मागतो. परंतु त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यास मी त्यांना सलाम करेन, असे अभिनेता कमल हासन यांनी म्हटले आहे.  

एका तामिळ वृत्तपत्रात कमल हासन यांनी लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणाले, नोटबंदीचे मी फारच लवकर समर्थन केले. त्याबद्दल माफी मागतो. काळ्या पैशाला लगाम लागेल असे मला अगोदर वाटले होते. एवढेच नव्हे तर त्यासाठी जनतेने त्याचे आेझे स्वीकारले पाहिजे, असे माझे मत होते. परंतु मी चूक होतो, असे सांगून हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. चांगला नेता आपल्या चुका स्वीकारतो. महात्मा गांधींनी आपल्या चुका स्वीकारल्या होत्या. आजच्या नेत्यांकडूनही हीच अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी या निर्णयाबद्दल माफी मागितल्यास मी त्यांना सलाम करेन, असे हासन यांनी लेखात म्हटले आहे.  गतवर्षी नोव्हेंबरमध्ये नोटबंदी जाहीर झाल्यानंतर कमल हासन यांनी ट्विट करून सॅल्यूट मिस्टर मोदी, अशी पोस्ट केली होती. या निर्णयाचे पक्षापलीकडे जाऊन स्वागत केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.  
बातम्या आणखी आहेत...