आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Samajawadi Party Rajya Sabha Member Threatens Tehsildar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AUDIO: सपा खासदाराची अधिकाऱ्याला धमकी, \'ट्रॅक्टर सोडा, नोकरी करायला शिकवतो\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशी - समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील खासदार चंद्रपाल यादव यांच्यावर एका प्रामाणिक तहसीलदाराला फोनवरून धमकी देऊन त्याची बदली करवून आणल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील एक अॉडिओही समोर आला आहे. त्यात यादव हे तहसीलदाराला धमकीच्या सुरात एक ट्रॅक्टर सोडण्यास सांगत असून, त्याला नकार दिल्यानंतर ते त्याला चोर म्हणत आहेत.

तहसीलदाराचे असे म्हणणे आहे की, वाळू माफियाचे ट्रॅक्टर अडवल्यानंतर ते सोडले नाही म्हणून खासदाराने चोर असल्याचे सांगत 24 तासांत याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांची बदली कानपूर ग्रामीणमध्ये करण्यात आली.

झाशीच्या टहरोली परिसराचे तहसीलदार गुलाब सिंह यांनी गेल्या रविवारी वाळू माफियाचे एक ट्रॅक्टर जप्त केले होते. त्याचे म्हणणे होते की, सोमवारी समाजवादी पार्टीचे खासदार चंद्रपाल यादव यांनी त्यांनी पोन करून ट्रॅक्टर-ट्रॉली सोडण्यास सांगितले. तहसीलदाराने नकार दिला त्यावर खासदार भडकले आणि त्यांना धमकी देऊ लागले. त्या प्रकाराचा एक ऑडिओ समोर आला आहे. त्यात खासदार महोदय या तहसीलदाराला धमकी देत असल्याचे जाणवत आहे.

अधिकाऱ्यांना दिली माहिती
तहसीलदाराने झाशीचे एसडीएम आणि एडीएम यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण डीएम अनुराग यादव यांच्याकडेही गेले. तहसीलदारांनी याप्रकरणी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
पुढील स्लाइडवर ऐका खासदार महोदयांनी तहसीलदाराला दिलेली धमकी...