आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या मर्डरच्या आरोपात तुरुंगात होता अमनमणि, आता SP च्या पहिल्या उमेदवार यादीत नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमनमणिने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जुलै 2013 मध्ये लखनौमधील अलीगंज येथील आर्य समाज मंदिरात साराशी विवाह केला होता. - Divya Marathi
अमनमणिने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जुलै 2013 मध्ये लखनौमधील अलीगंज येथील आर्य समाज मंदिरात साराशी विवाह केला होता.
लखनौ - समाजवादी पक्षाची उत्तर प्रदेश विधानसभेची पहिली उमेदवार यादी प्रसिद्ध झाली आहे. महाराजगंजमधील नौतनवा मतदारसंघातून अमनमणि त्रिपाठीला समाजवादी पक्षाने तिकीट दिले आहे. अमनमणिवर पत्नी सारा सिंहच्या हत्येचा आरोप असून या प्रकरणात त्याला जेलमध्येही राहावे लागले होते. दुसरीकडे त्याचे वडील माजी मंत्री अमरमणि हे आधीपासूनच मधुमति शुक्ला हत्याकांडात शिक्षा भोगत आहे. सोमवारी समाजवादी पक्षाने 26 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. तिकीट वाटपावर मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले, मी माझी सवय बदलू शकत नाही. मी बुद्धीबळ खेळणारा माणूस आहे.

आणखी काय म्हणाले अखिलेश...
- तिकीट वाटपावर अखिलेश यादव म्हणाले, माझे मत तुम्हाला माहित आहे. हे अधिकारांचे भांडण नाही. मी सर्व अधिकार सोडले आहेत. मात्र मी माझी सवय सोडलेली नाही. मी बुद्धीबळपटू आहे. ज्याच्याकडे हुकमाचे पान असेल तो जिंकू शकतो.
सारा सिंहच्या आईने काय म्हटले ?
- अमनमणिची सासु सीमा सिंह यांनी त्यांच्या जीवाला अमनमणि आणि सपाच्या अनेक बड्या नेत्यांपासून धोका असल्याचे म्हटले आहे.
- त्या म्हणाल्या, की अमनला मिळणारी उमेदवारी थांबवली जावी यासाठी कोर्टाला विनंती करेल.

असा झाला होता अपघात
सारा आणि अमनमणि 9 जुलै 2013 च्या दुपारी स्विफ्ट कारने लखनौहून दिल्लीला जात होते. कार अतिशय वेगात होती. दोघांनी सिटबेल्ट बांधले नव्हते. अमनमणि ओव्हरटेक करीत असताना त्याने अचानक ब्रेक लावला. कार डिव्हायडरवर धडकली. सारा उसळून कारच्या समोर असलेल्या काचेवर कोसळली. काच फुटली. डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अमनमणिला मात्र किरकोळ जखमा झाल्या होत्या. यावरून संशयाचे मोहोळ उठले होते.
काय आहे अमनमणिवर आरोप...
बातम्या आणखी आहेत...