आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळविक्रेत्याचे पैसे न देणाऱ्या फौजदाराला रस्त्यावर फटकारले होते या तरुणीने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षात एकीकडे मुलायमसिंह उमेदवारांची घोषणा करीत आहेत, दुसरीकडे अखिलेश यादव स्वतःला पक्षाचा अध्यक्ष घोषित करुन नवी यादी जाहीर करतात असा घटनाक्रम काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान मुलायमसिंहांनी जाहीर केलेल्या यादीतील नाशी खान नावाच्या एक उमेदवार चर्चेत आहे. नाशी या फक्त युवा चेहरा म्हणून प्रसिद्ध नाहीत, तर त्यांच्या कामांमुळे त्या चर्चेत आहेत. त्यांना यंग अचिव्हर लिडर्स पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. dainikbhaskar.com सोबतच्या बातचीतमध्ये नाशी यांनी त्यांच्या आयुष्यासंबंधी अनेक गोष्टी शेअर केल्या. 
 
 राजकारणाची एबीसीडी आईकडून शिकले 
 - नाशी म्हणाल्या, मला राजकीय वारसा होता, त्यामुळेच मला एवढ्या कमी वयात सत्ताधारी पक्षाचे तिकिट मिळाले. माझी आई नजीबा आमदार आहेत.
 - आई साधारण 22 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहे. 
 - ती नेहमी लोकांमध्ये जाते, त्यांचे दुःख, प्रश्न जाणून घेते. सामाजिक कामात आई नेहमी पुढे असते. 
 - 2012 च्या विधानसभा निवडणुकीत सपाने त्यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा मी आग्रा येथे कायद्याचे शिक्षण घेत होते. 
 - राज्यात समाजवादी पक्षाची सत्ता आली त्यानंतर 2013 मध्ये सहकार खात्यात 13 संचालकांची निवड झाली, त्यात माझा समावेश होता. विशेष म्हणजे माझी निवड बिनविरोध झाली होती. 
 - नाशी या सहकार खात्यातील सर्वात तरुण संचालक आहेत. 
 
 फुकट फळे खाणाऱ्या पोलिसावर भडकली होती नाशी 
 - नाशी 2015 मध्ये माध्यमांमध्ये चर्चेत आली. पटियाला पोलिस स्टेशनमधील फौजदार सुशील कुमार अनेक दिवसांपासून गावातील एका फळविक्रेत्याकडून पैसे न देता फळे घेऊन जात होते. 
 - एक दिवस सुशीलकुमारने 2 किलो सफरचंद घेतले. फळविक्रेत्याने पैसे मागितल्यानंतर फौजदाराने वर्दीचा रुबाब दाखवत त्याला तुरुंगात डांबण्याची धमकी दिली. 
 - त्याचवेळी नाशी तेथून जात होती, तिने फौजदाराची मुजोरी पाहिली. 
 - नाशी फौजदाराजवळ गेली आणि त्याला भररस्त्यावर फटकारले आणि गरीब फळविक्रेत्याला पैसे मिळवून दिले. त्यासोबतच यापुढे फूकट खाण्याची सवय सोडून द्या, असा सज्जड दम भरला.
 
 लहानपणापासून भाषणाची आवड, दक्षिण आफ्रिकेत केले होते देशाचे प्रतिनिधीत्व 
 - नाशी सांगते, मला राजकारणाचा वारसा भलेही आईकडून मिळाला असेल, मात्र बोलण्याची कला ही माझी स्वतःची आहे. 
 - शाळेत असताना माझ्या बोलक्या स्वभावामुळे अनेक स्पर्धांमध्ये (वकृत्व) बाजी मारत होते. 
 - 2015 मध्ये साऊथ आफ्रिकेत झालेल्या कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी कॉन्फरन्ससाठी माझी निवड झाली होती. तिथे मी देशाचे प्रतिनिधीत्व केले होते. या परिषदेला 58 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
 - नाशी खानचा जन्म उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात झाला, तर बालपन सहावर येथे गेले. 
 - नाशीचे पेटनेम फेरी आहे. तिला कादंबऱ्या वाचायला आवडतात. ड्रायव्हिंग तिची डायहार्ट हॉबी आहे. क्रिकेट पाहाण्याचाही तिला छंद आहे.  
 
 पुढील स्लाइडमध्ये पाहा, नाशीखान या समाजवादीच्या तरुण उमेदवाराचे फोटोज्... 
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)