आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP मध्ये काँग्रेसची प्रथमच सपाबरोबर आघाडी; डिंपल-प्रियंका, अखिलेश-राहुल करणार एकत्र प्रचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. असे असले तरी सत्ताधारी समाजवादी पक्षातील यादवी संपलेली नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे आणि काँग्रेससोबत आघाडी होण्याचे चिन्ह आहे. दुसरीकडे त्यांचे वडील मुलायमसिंह यादव 'शेत नांगरणारा शेतकरी' या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 
 
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी होऊ शकते. यावर विचार करण्यासाठी राहुल गांधींनी बुधवारी दिल्लीत उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. शक्यता आहे की दोन्ही पक्षांची आघाडी होऊन ते एकत्र प्रचार सुरु करतील. दोन्ही पक्षातील सुत्रांच्या माहितीनुसार अखिलेश आणि डिंपल यादव यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी एकत्र प्रचार करतील. या निवडणुकीत प्रियंका जास्त अॅक्टिव्ह झाल्या आहेत. 27 वर्षांपासून उत्तर प्रदेशातील सत्तेच्या परिघाबाहेर असलेली काँग्रेस प्रथमच समाजवादी पक्षासोबत निवडणूक लढणार आहे. 
 
काँग्रेससाठी प्रशांत किशोर करत आहेत काम 
- काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली तर त्याचा पक्षाला मोठा फायदा होईल. उत्तर प्रदेशात काँग्रेसची निवडणूक रणनीती प्रशांत किशोर तयार करीत आहेत. 
- ज्येष्ठ पत्रकार योगेश श्रीवास्तव म्हणाले, उत्तर प्रदेशात काँग्रेस नेहमी आघाडी करुन सत्तेवर आली आहे. बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करुन ते सत्तेत होते. मात्र समाजवादी पक्षासोबत हा त्यांचा पहिला प्रयोग असणार आहे. 
- बहुजन समाज पक्ष आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत, या दोन्ही बलाढ्य पक्षांना शह देण्यासाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला आघाडी करावी लागत आहे. सपासाठी ही गरज आहे तर काँग्रेससाठी मजबुरी आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...