लखनऊ - समाजवादी पक्षात सुरु असलेल्या ताणाताणीत मुलायमसिंह रविवारी पक्ष कार्यालयात आले आणि त्यांनी एक नवेच वक्तव्य केले. लखनऊमधील पक्ष कार्यालयात कार्यकर्तांना ते म्हणाले, 'पक्षात कोणताही वाद नाही तर समेट कसला? दोन-तीन महिने काय असतात?' येथे त्यांनी अखिलेश यादव यांची राष्ट्रीय अध्यक्ष आणि नरेश उत्तम यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षाची नेमप्लेट काढून टाकली. त्यानंतर मुलायम यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्षाची आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून शिवपाल यांच्या नावाची पाटी पुन्हा लावली. त्यानंतर मुलायम यांनी पक्ष कार्यालयाला कुलूप ठोकून ते दिल्लीला रवाना झाले.
ओएसडीकडून घेतली चावी
- मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, अखिलेश यादव मुख्यमंत्री आहेत तर रामगोपाल यादव यांची आधीच हकालपट्टी झाली आहे. त्यामुळे त्यांचे अधिवेशनही अवैध होते, असे मुलायम म्हणाले.
- मुलायमसिंहांनी त्यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) जगजीवन यांच्याकडून कार्यालयाच्या चाव्या घेऊन स्वतःजवळ ठेवून घेतल्या.
- त्यावेळी अखिलेश गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते.
- अशी माहिती आहे की मुलायमसिंह आणि अमरसिंह सोमवारी निवडणूक आयोगाकडे जातील.
सूत्रांची माहिती आहे की अमरसिंग दिल्लीत मुलायमसिंह आणि शिवपाल यांची काही खास लोकांसोबत भेट घडवून आणणार आहेत.
- सायकल चिन्ह मुलायमसिंह यांनाच कसे मिळेल, हे समजून सांगणारे हे लोक असणार आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)