आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायम EC च्या दारी, म्हणाले- अखिलेशची दिशाभुल, याला केवळ एक व्यक्ती जबाबदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पक्षातील यादवी संपण्याचे नाव घेत नाही. मुलायमसिंह आणि अखिलेश यादव आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुलायमसिंह यांनी आज अमरसिंह आणि शिवपाल यादव यांच्यासह निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर अखिलेश यांच्या गटानेही आयोगाची भेट घेतल्याचे वृत्त आहे. दोन्ही गट पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह सायकलवर दावा सांगत आहेत.
 
यावेळी बोलताना मुलायमसिंह म्हणाले, की माझ्या मुलाची दिशाभुल करण्यात आली आहे. माझ्या पक्षात थोडेबहुत मतभेद आहेत. केवळ एक व्यक्ती कट रचत आहे. आम्ही आमच्यातील मतभेद मिटवून टाकू. कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या नावावर सहमती तयार करावी. मतभेद असलेल्या मतदारसंघात मी निर्णय घेणार आहे. निवडणूक आयोग चिन्ह देणार आहे. माझ्यात आणि मुलात किंचित मतभेद आहेत. काही दिवसांत ते मिटलेले असतील.
 
अखिलेश गटाचे रामगोपाल यादव म्हणाले, की सगळे कागदपत्र आम्ही आधीच निवडणूक आयोगला दिले आहेत. आज केवळ एवढेच सांगायला आलोय, की निर्णय लवकर घ्या. 17 जानेवारीपासून नॉमिनेशन सुरु होणार आहेत. आयोगाने आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. मुलायम यांच्या वक्तव्यावर मला काही बोलायचे नाही.
 
शनिवारी अखिलेश गटाचे प्रो. रामगोपाल यांनी आयोगाकडे आपला पक्ष मांडला. त्यांनी सात बॉक्स भरून दावेदारीचे दस्तऐवज आयोगाला सादर केले. आयोगाने दोन्ही गटांना 9 जानेवारीपर्यंत शपथपत्र दाखल करण्यास सांगितले होते. आयोगाच्या फेऱ्यात अडकलेले मुलायमसिंह मुख्यमंत्रीपदासाठी आझम खान यांना पुढे करण्याची चर्चा सुरु झाली आहे. 

मुलायम जाणार निवडणूक आयोगाकडे 
- सपामधील यादवी टोकाला गेली आहे. पिता मुलाचे ऐकायला तयार नाही, आणि मुलाने लावलेली अध्यक्षपदाची पाटी काढून पित्याने मुलाला स्थान नसल्याचे दाखवून दिले आहे. 
- या भांडणादरम्यान मुलायमसिंहांनी आगामी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे निकटवर्तीय आझम खान यांना प्रोजेक्ट करण्याचे मनोमन ठरविले असल्याची चर्चा आहे. 
- यावरच आझम खान यांच्या निवासस्थानी शिवपाल यादव आणि काही जवळचे लोक चर्चा करीत आहेत. 
- याच दरम्यान, आज मुलायमसिंह दुपारी 12.45 वाजता निवडणूक आयोगाकडे सायकल आपली असल्याचा दावा करतील. त्यांच्यासोबत अमरसिंह आणि शिवपाल जाण्याची शक्यता आहे. 
 
गोठवले जाऊ शकते चिन्ह 
- दोन्ही गटांनी एकाच चिन्हावर निवडणूक लढण्याचा हट्ट धरला आहे. तज्ज्ञांचे मत आहे की आयोग यावर घाईघाईत निर्णय घेऊ शकत नाही. संपूर्ण चौकशीअंतीच निर्णय होईल. त्यासाठी आयोगाला पुरेसा वेळ लागणार आहे. 
- अशा परिस्थितीत चौकशी सुरु असे पर्यंत आयोग सायकल चिन्ह फ्रीज करु शकते. दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागू शकते. 
- याची माहिती अखिलेश समर्थकांनाही आहे. त्यामुळेच कदाचित अखिलेश यांचे कट्टर समर्थक आमदार उदयवीर यांनी चिन्ह हे फार महत्त्वाचे नाही असे म्हटले असण्याची शक्यता आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)