आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादवी : शिवपाल येताच फिस्कटली अखिलेश-मुलायम चर्चा , CM म्हणाले आता उशीर झाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ/नवी दिल्‍ली - सपामध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यांनी सुमारे तीन तास चर्चा केली. पिता पुत्राची ही चर्चा अगदी योग्य दिशेने पुढे सरकत असतानाच शिवपाल आणि सर्व काही फिस्कटले असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर अखिलेश परतल्यानंतर रामगोपाल यादव म्हणाले की आता, तडजोड शक्य नाही. आम्ही अखिलेश यांच्यात नेतृत्त्वात निवडणूक लढवणार आहोत. चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. तर आजम खान म्हणाले, अजूनही तडजोड होऊ शकते. दुसरीकडे निवडणूक आयोग सायकल हे चिन्हं गोठवून दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हं देऊ शकतात अशी शक्यता आहे. 

अखिलेश यांच्या चार अटी.. 
सुत्रांच्या मते भेटीदरम्यान अखिलेश यांनी मुलायम यांच्यासमोर चार अटी ठेवल्या. 
1. अमर सिंहयांचे निलंबन करण्यात यावे. 
2. शिवपाल यांना केंद्रीय राजकारणात पाठवावे. 
3. तिकिट वाटपाचे काम केवळ दोघांनी करावे अखिलेश आणि मुलायम.  
4. अखिलेश यांच्या गटातील समर्थकांचे निलंबन मागे घ्यावे. 
 
अमरसिंहांना हटवण्यास नकार...
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन तासांच्या या भेटीदरम्यान सुरुवातीच्या एका तासात मुलायम यांचे अखिलेश यांच्या मुद्द्यांशी एकमत होते. त्यानंतर शिवपाल आले. त्यांनी अमरसिंग यांच्या हकालपट्टीस नकार दिला. त्यानंतर रामगोपाल यांना बाहेर पाठवण्याच्या मुद्द्यावर अडून बसले. 
- असेही म्हटले जात आहे की, रामगोपाल हे शिवपाल यांना केंद्रीय राजकारणात पाठवण्यासही तयार नाहीत. अमरसिंह आणि रामगोपाल यांच्यातील वाद जुना आहे. 

रामगोपाल आणि अणि अमरसिंह संधीचा फायदा उचलण्याच्या तयारीत 
- कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, अमरसिंह आणि रामगोपाल यादव यांच्यातील जुन्या वादामुळेच पिता पुत्रातील वाद अधिक वाढत आहे. 
- रामगोपाल त्यांचा खासदार मुलगा अक्षयला अखिलेशच्या स्पर्धेत उतरवण्याचा विचार करत आहेत तर अमरसिंह मुलायम यांच्या मदतीने पक्षात जुनी ओळख मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशीही चर्चा आहे. 
अखिलेश गट म्हणाला, चिन्हं महत्त्वाचे नाही... 
- अखिलेश गटातील राजपाल कश्यप म्हणाले की, रविवारी जे अधिवेशन बोलावण्यात आले होते त्यात अखिलेश यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याच्या प्रस्तावावर 90% सदस्यांनी सह्या केल्या. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमद्ये याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळाला. 
- अधिवेशन शिष्टमंडळाच्या लेखी मागणीवर बोलावण्यात आले होते. ते पूर्णपणे वैध होते. काही लोक नेताजींना फसवत आहेत. 
- कश्यप म्हणाले, आम्ही सायकल चिन्हं आमच्याकडे ठेवू. पण अखिलेश स्वतःच एक चिन्हं आहेत. निवडणूकीत ज्याला पाठिंबा असतो तोच महत्त्वाचा असतो. 

अखिलेश यांना बनवले होते पक्षाचे अध्यक्ष 
- रविवारी लखनौमध्ये जालेल्या सपाच्या अधिवेशनात अखिलेश यादव यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. 
- मुलायम सिंह यांनी मात्र हे अधिवेशन अनाधिकृत असल्याचे सांगत रामगोपाल यांचीच हकालपट्टी केली होती. 
- अखिलेश कॅम्प हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल की, समाजवादी पार्टीचे नेतृत्त्व सध्या अखिलेश यादव करत आहेत. 
- अखिलेश कॅम्प सायकल या निवडणूक चिन्हावर दावा करू शकते. पण दोन्ही गटांच्या दाव्यावर निर्णयासाठी निवडणूक आयोग काही महिन्यांनी निकाल देईल. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसा पेटत गेला समाजवादी पक्षातील वाद...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...