आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायमसिंहाची शिवपाल यादवसह वरिष्ठ नेत्यासोबत बैठक, वाद मिटवण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ (उत्तर प्रदेश) - समाजवादी पक्षातील वादाला पूर्णविराम देण्यासाठी मुलायमसिंहांनी शनिवारी शिवपाल यादव आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. 5, विक्रमादित्य मार्ग येथील निवासस्थानी आयोजित या बैठकीला उपस्थित राहिलेले शिवपाल यादव यांनी मुलायमसिंहासोबत थोडावेळ चर्चा केली आणि ते निघून गेले. त्यानतंर ते परत बैठकीला हजर राहिले. दरम्यान सप नेत्यांची इतरांसोबत चर्चा सुरु होती. अखिलेश यादव यांनी शुक्रवारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक बोलवली होती, त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला बेनी प्रसाद वर्मा, किरणमय नंदा, नरेश अग्रवाल, रेवती रमण, धर्मेंद्र यादव आणि विधानसभाध्यक्ष माता प्रसाद उपस्थित होते.
- मुलायमसिंहाची भेट घेऊन शिवपाल यादव पक्षाच्या कार्यलयाकडे रवाना झाले. तिथे पक्षाच्या स्टेट एक्झिकेटिव्हसोबत चर्चा करुन ते परत बैठकील हजर झाले.
- समाजवादी पक्ष कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीदरम्यान बाहेर शिवपाल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होत होती. अनेक लोक त्यांच्या समर्थनार्थ बॅनर आणि पोस्टर घेऊन पक्षाच्या मुख्यालयाबाहेर उपस्थित होते.
- पक्षाच्या स्टेट एक्झिकेटिव्हच्या बैठकीमध्ये रौप्य महोत्सवावर चर्चा झाली, मात्र अखिलेश यादव यांच्या रथयात्रेबद्दल कोणीही अवाक्षर काढले नाही.
ज्येष्ठ नेते किरणमय नंदा म्हणाले, पक्षाचे सिनियर नेते मुलायम यांच्यासोबत आहेत. मुलायमसिंह हेच पक्षाचा प्राण आहेत. मुख्यमंत्रीही नेताजीचे म्हणणे ऐकतात.
- नेताजींचा प्रत्येक निर्णय आमच्यासाठी आदेश आहे. मुलायमसिंह जे सांगतिल तेच सपमध्ये होणार आहे. आम्ही सर्व एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...