आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या विरुद्ध आघाडी, मुलायम यांची मोर्चेबांधणी; समेटाऐवजी निवडणुकीवर लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष शिवपाल यांनी अखिलेश यांचे निकटर्तीय पवन पांडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. - Divya Marathi
सपाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष शिवपाल यांनी अखिलेश यांचे निकटर्तीय पवन पांडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
लखनऊ- सपामधील सत्तासंघर्षात पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव विधानसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यादव कुटुंबातील फुटीचा फायदा भाजपने उचलू नये याची संपूर्ण काळजी ते घेत आहेत. अशा स्थितीत अल्पसंख्याक मतांचे विभाजन होऊ नये यासाठी मुलायम भाजपविरोधी आघाडी बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी काँग्रेस रालोदशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी शिवपाल यादव यांच्यावर सोपवली आहे. जातीयवादी शक्तींविरुद्ध संपूर्ण शक्तीनिशी लढा दिला जाईल,असे शिवपाल यंानी या पार्श्वभूमीवर सांगितले .

उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेत्या शीला दीक्षित म्हणाल्या, शिवपाल आणि अखिलेश एकत्र नसल्यामुळे दोघांशी वेगवेगळी चर्चा होईल. काम करण्याच्या दृष्टीने अखिलेश चांगले आहेत.
त्यांच्या सरकारमध्ये कोणता घोटाळाही समोर आला नाही. याचाच अर्थ सपच्या फुटीत त्यांनी अखिलेश यांच्यासोबत जाण्यास पसंती दर्शविली.

दुसरीकडे, राष्ट्रीय लोकदलही नितीश कुमार यांचा जदयू शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे. अद्याप सपशी चर्चा झाली नाही. काँग्रेसला आघाडीबाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रालोदने म्हटले आहे. आघाडीच्या शक्यतेमुळे भाजपमधील घालमेल वाढली आहे. पक्ष प्रवक्ते श्रीकांत शर्मा म्हणाले, २०१२ मध्ये मतदारांनी मोठ्या आशेने अखिलेश यांना निवडले होते. आता बहूमतासाठी आघाडी करावी लागते हा त्यांचा नाईलाज आहे.

अखिलेश यांच्या रथयात्रेच्या तयारीत दिग्गज :
पक्ष आणि कुटुंबातील वादामध्ये अखिलेश यादव यांच्या नोव्हेंबरपासूनच्या रथयात्रेची तयारी सुरू झाली . त्यात अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. अखिलेश यांनी यासंदर्भात एक बैठकही घेतली. पक्ष उपाध्यक्ष किरणमय नंदा यांनी अखिलेशच पक्षाचा चेहरा असतील,असे सांगितले. रथयात्रेत बेनीप्रसाद वर्मा, रेवती रमण सिंह आणि नरेश अग्रवाल यासारखे बडे नेते सहभागी झाले आहेत.

भाजपविरुद्ध जदयूकडून समाजवादी पक्षांची मोट
पाटणा- जदयू देशात विखुरलेल्या समाजवादी पक्षांना एकत्र आणण्याची मोहीम सुरू करणार आहे. जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायणसिंह यांनी बुधवारी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांनी देशहितासाठी पुन्हा पुढाकार घेतला पाहिजे. शरद पवार, अजितसिंह, बाबूलाल मरांडी आणि ओमप्रकाश चौटाला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपविरोधी पक्षांची मोट बांधून भाजपला शह देण्याचा हा प्रयत्न आहे.

शिवपाल यांनी अखेर सोडले सरकारी निवासस्थान
मुलायमसिंह यांनी बडतर्फ मंत्री शिवपालसिंह यादव, नारद राय ओम प्रकाशसिंह यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर शिवपाल यांनी आपले सरकारी निवासस्थान सोडले. त्यामुळे बडतर्फ मंत्री सरकारमध्ये आता पुन्हा परतणार नाहीत, असे स्पष्ट संकेत मिळाले.

अखिलेश समर्थक मंत्री पांडेय समाजवादी पक्षातून निलंबित
पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याच्या प्रक्रियेत बुधवारी वनमंत्री पवन पांडेय यांना शिवपाल यांनी सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. आमदार आशू मलिक यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप पांडेय यांच्यावर होता.

२०५ आमदार पाठीशी, अखिलेश यांचा दावा
बदलत्या राजकीय स्थितीत बुधवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अचानक राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली. ४० मिनिटांच्या चर्चेत त्यांनी राज्यात घटनात्मक संकट नसल्याचे सांगितले. त्यांनी २०५ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावले होते, अशी माहिती राज्यपालांनी दिली.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...