आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपातील यादवीनंतर आता मुलायमसिंह आजारी, 5 जानेवारीला बोलावलेले अधिवेशन पुन्हा रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या वादांत आता मुलायम सिंह यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची भर पडली आहे. मुलायम सिंह यादव आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्यावतीन 5 जानेवारीला बोलावण्यात आलेले पक्षाचे अधिवेशनही रद्द करण्यात आले आहे. रविवारी रात्री डॉक्टरांनी त्यांचे चेकअप केले. न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार मुलायम यांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे. सायंकाळी अखिलेश यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले की, अनेकदा आपल्या लोकांचा वाचवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात पण ते गरजेचे असतात. 

शिवपाल म्हणाले... कसमें वादे..
- शिवपाल यादव यांनी रविवारी सायंकाळी मीडियाबरोबर अनौपचारिक चर्चा करताना एका जुन्या गाण्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या?
- त्यानंतर शिपपाल म्हणाले, मंगळवारी मी आणि नेताजी दिल्लीला जात आहोत. निवडणूक आयोगाबरोबर आम्ही बोलणार आहोत. आम्ही आयोगाला फॅक्स आणि मेल केला आहे. ज्याला जिकडे जायचे तिकडे जावे, 5 जानेवारीपर्यंत वाट पाहा, निर्णय होईलच. 
 
रविवारी काय घडले...
दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी समाजवादी पार्टीच्या कथित अधिवेशनात अखिलेश यांनी आपल्या पित्याचीच पक्षातील सत्ता उलथवून टाकली. मुलायम यांना मार्गदर्शक घोषित करण्यात आले.  या अधिवेशनातअखिलेश यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आले. तर, मुलायम यांचे विश्वासू शिवपाल यादव यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले. दुसरीकडे अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
मुलायमसिंहांनी हे अधिवेशन आणि यातील निर्णय अवैध असल्याचे म्हटले. त्यांनी या अधिवेशनाचे सूत्रधार असलेले रामगोपाल यादव यांना तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पक्षातून काढून टाकले. या अधिवेशनात सहभागी झालेले नरेश अग्रवाल व किरणमय नंदा या बड्या नेत्यांची मुलायम यांनी पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान, मुलायम यांनी ५ जानेवारी रोजी पक्षाचे वेगळे अधिवेशन बोलावले आहे.

नरेश उत्तम प्रदेशाध्यक्ष
अखिलेश यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर त्यांनी शिवपाल यादव यांच्या जागी नरेश उत्तम यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. यादरम्यान, अखिलेश समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष कार्यालयावर ताबा घेत शिवपाल यांची नेमप्लेट काढून फेकली. या भागातील तणाव पाहता पक्ष कार्यालयाच्या परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या अधिवेशनात बोलताना अखिलेश म्हणाले, ‘काही लोक नेताजींची (मुलायम यांची) दिशाभूल करून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडत आहेत.’

भाजपला मदतीसाठी डाव
रम्यान, समाजवादी पार्टीच्या संसदीय पक्षाने म्हटले आहे की, भाजपला मदत करण्यासाठी व सीबीआय चौकशीच्या फेऱ्यातून सुटका व्हावी म्हणून काही लोक हा कट करत अाहेत. विशेष म्हणजे ज्या नेत्यांना मुलायम यांनी सांभाळले, उच्च पदे दिली ते नेतेही अखिलेश समर्थकांच्या अधिवेशनात हजर होते. यात कुंवर रेवतीरमण सिंह, किरणमय नंदा, बलराम यादव, राजेंद्र चौधरी आदींचा समावेश होता.

इकडे अधिवेशन, तिकडे संसदीय पक्षाची  बैठक
लायमविरोधकांच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून जनेश्वर मिश्र पार्कमध्ये मुलायम यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय पक्षाची बैठक झाली. मुलायम यांच्या परवानगीविना बोलावण्यात आलेले पक्षाचे अधिवेशन व मंजूर झालेले ठराव अवैध असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. रामगाेपाल यादव यांच्या पक्षातून हकालपट्टीवरही शिक्कामोर्तब करण्यात आले. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुलायम यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावांवर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. उर्वरित उमेदवारांची घोषणा करण्याचे अधिकारही मुलायम यांनाच देण्यात आले. 

खरी लढाई निवडणूक चिन्हावरून
मुलायम व अखिलेश यांच्यातील लढाई आता राजकीय डावपेचांपेक्षा कायदेशीर रूप घेत चालली आहे. कारण खरी लढाई आता निवडणूक चिन्हावरून होणार आहे. रविवारच्या अधिवेशनात मंजूर चार ठराव घेऊन रामगाेपाल यादव व अखिलेश सोमवारी निवडणूक आयोगाकडे दाद मागतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे अखिलेश समर्थकांचे अधिवेशन अवैध असल्याचे पत्र घेऊन संसदीय पक्षाचे सदस्य निवडणूक आयोगाकडे आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा करू शकतात.
 
अधिवेशनातील ठराव
- अखिलेश यादव यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले.
- मुलायम सिंह यादव हे पक्षाचे मार्गदर्शक असतील.
- शिवपाल यादव यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी
- अमरसिंह यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी. 

 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटो आणि मुलायम यांनी काढलेले पत्रक...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...