आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक चिन्हासाठी मुलायमसिंह आयोगाकडे, अखिलेश यादव आज घेणार आयोगाची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुलायमसिंह यादव यांनी मीडियाशी चर्चा केली. - Divya Marathi
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुलायमसिंह यादव यांनी मीडियाशी चर्चा केली.
नवी दिल्ली/लखनऊ- उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षातील लढाई सोमवारी राजधानी नवी दिल्लीकडे सरकली आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आधी ५ जानेवारीला बोलावलेले अधिवेशन रद्द केले आणि नंतर ‘सायकल’ या चिन्हावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगाशी संपर्क साधला.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वडील मुलायमसिंह यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवले आहे. तेही सायकल या चिन्हावर दावा करण्यासाठी मंगळवारी आयोगाकडे जाणार आहेत. दुसरी बाजू ऐकून घेतल्याशिवाय आयोग हस्तक्षेप करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुलायमसिंह यांनी सोमवारी संध्याकाळी आयोगासमोर निवडणूक चिन्हाबाबत भूमिका मांडली. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ शिवपाल यादव, अमरसिंह, आणि माजी खासदार जयाप्रदा आदी होते. ‘मी अजूनही समाजवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. दुसऱ्या गटाने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड केली असून ती पक्षाच्या घटनेविरोधात आहे,’ असे मुलायम यांनी सांगितले. रामगोपाल यादव यांनी अखिलेश यांना पक्षाध्यक्षपदी नियुक्त करण्याचा ठराव मांडला होता, पण रामगोपाल यांना याआधीच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पक्षाबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. दुसऱ्या गटाच्या अधिवेशनात मला पक्षाध्यक्षपदावरून हटवण्याचा कुठलाही ठराव मंजूर करण्यात आलेला नाही, असे मुलायम यांनी आयोगाला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायकल हे चिन्ह गोठवल्यास दोन्ही गटांनी नवे नाव आणि चिन्ह स्वीकारावे, असे आयोग सांगू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
शिवपाल म्हणाले मुलायम हेच अध्यक्ष..
- शिवपाल यादव दिल्लीत म्हणाले की, नेताजीच सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तेच पुढेही राहतील. आम्ही अखेरच्या क्षणापर्यंत नेताजींच्याच बरोबर राहू. 
- अमर सिंह म्हणाले, मुलायमसिंह यांच्याबरोबर राहिल्याने मी नायक बनलो, तर आता खलनायक बनण्याचीही माझी तयारी आहे. 
- अमरसिंह हे पक्षात नव्हे तर माझ्या मनात राहतात असे मुलायम म्हणाले होत. 

मुलायम म्हणाले सायकल तर माझी.. 
- मीडियाने नेहमी मला पाठिंबा दिला आहे. मी कधीही कोणते चुकीचे काम किंवा भ्रष्टाचार केला नाही. आरोपातूनही सुप्रीम कोर्टाने मला मुक्त केले. 
- पक्षाच्या चिन्हाच्या वादाबाबत बोलताना ते म्हणाले सायकल तर माझीच आहे. 
 
अधिवेशन रद्द करण्याचे कारण.. 
- शिवपाल यादव यांनी सोमवारी दोन ट्वीट केले. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले.. नेताजींच्या आदेशानुसार समाजवादी पार्टीचे 5 जानेवारीचे अधिवेशन सध्या स्थगित करण्यात येत आहे. 
- दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू करावी आणि जिंकण्यासाठी संपूर्ण परिश्रम घ्यावे. 
- त्यापूर्वी रविवारी सकाळी लखनौच्या जनेश्वर मिश्र पार्कमध्ये रामगोपाल यांनी अधिवेशन बोलावले होते. त्यात मुलायम यांना पदावरून हटवून अखिलेश यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. 
- सायंकाळी शिवपाल यांच्या ईमेलवरून मुलायम यांच्या सहीचे एक लेटर जारी करण्यात आले. त्यात रामगोपाल यांची हकालपट्टी केल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

पक्षाच्या चिन्हावरून वाद.. 
- अखिलेश आणि मुलायम यांनी यूपी निवडणुकांच्या तोडांवर विधानसभा उमेदवारांच्या वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत. 
- आता पक्षाच्या या वादात दोन्ही गट पक्षाचे निवडमूक चिन्ह (सायकल) वरच निवडणूक लढवू इच्छितात. त्याबाबत सोमवारी दिल्लीत पुढील रणनिती ठरू शकते. 

अखिलेश यांनी बोलावली बैठक 
- दरम्यान अखिलेश यांनीही पुढील धोरण ठरवण्यासाठी निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. 
- त्यात निवडणुकीला कसे सामोरे जायचे हे ठरवले जाणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, सपातील गेल्या काही महिन्यांतील या वादाशी संबंधित घडामोडी.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...