आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलायम यांच्या नकारानंतर यूपीत रालोद, जदयू, बीएस- ४ ची आघाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - राष्ट्रीय लोक दल (आरएलडी), जनता दल (यू) आणि स्थानिक पार्टी बीएस-४ यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी संयुक्त आघाडी घोषित केली आहे. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी युती करण्यास नकार दिल्यानंतर ही घोषणा झाली आहे.
आरएलडी प्रमुख अजित सिंह, जेडीयू नेते शरद यादव आणि बीएस-४ चे नेते बाचन सिंह यादव यांनी संयुक्त पत्र परिषदेत ही माहिती दिली. विधानसभेच्या सर्व ४०३ जागांसाठी ही संयुक्त आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. अद्याप या संयुक्त आघाडीचे नाव जाहीर करण्यात आले नाही. इतर स्थानिक राजकीय पक्ष देखील यात सहभागी होऊ शकतात. त्यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे नेत्यांनी सांगितले. सर्व लोहियावादी गट आणि चरणसिंह वादी पक्षांनी सपाशी युती करण्यास संमती दर्शवली होती. मात्र मुलायमसिंह यांनी त्यास नकार दिल्यामुळे हे झाले नाही, अशी टीका आरएलडी प्रमुख अजित सिंह यांनी केली.

सपाचा विलीनीकरणावर भर
विधानसभा निवडणुकीसाठी सपाने विलीनीकरणाचा मुद्दा लावून धरला आहे. समाजवादी पार्टी कोणाशीच युती करू इच्छित नाही. जेडीयूचे विलीनीकरण करण्यास आपण राजी होतो, असे शरद यादव म्हणाले. मात्र आता त्या बोलणीसाठीही अवधी नसल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...