आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायमसिंहाना मिळू शकते \'नांगरणारा शेतकरी\' चिन्ह, \'सायकल\' गोठवली तर अमरसिंह करतील मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मुलायमसिंह-अखिलेश या पिता-पुत्रामध्ये सायकल चिन्हावरुन वाद सुरु आहे. दरम्यान, अशी माहिती आहे की दोघांच्या भांडणात निवडणूक आयोगाने चिन्ह गोठविले तर मुलायमसिंहांना 'शेत नांगरणारा शेतकरी' हे त्यांचे बऱ्याच वर्षांपूर्वीचे निवडणूक चिन्ह मिळू शकते. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या हे चिन्ह लोकदालाकडे आहे. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील सिंह यांच्यासोबत यासंबंधीची चर्चा सुरु आहे. 
 
अमरसिंहानी घडवून आणली लोकदलबसोबत बातचीत 
- सुत्रांची माहिती आहे, की अमरसिंह यांनी लोकदलाचे अध्यक्ष सुनील सिंह यांच्यासोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. 
- मुलायम यांना सायकल चिन्ह मिळाले नाही तर ते त्यांच्या पूर्वीच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. मुलायमसिंहांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात लोकदलातून झाली होती. 
- 1982 मध्ये मुलायम लोकदलाचे अध्यक्ष होते. लोकदलाचे संस्थापक चौधरी चरणसिंह यांचा खरा राजकीय वारसदार मीच असल्याचेही त्यांनी यापूर्वी म्हटले होते. 
- 1985 मध्ये मुलायमसिंहांनी लोकदलाचे 85  उमेदवार निवडून आणले होते. त्यानंतर त्यांना विरोधीपक्ष नेते करण्यात आले होते. 
- अशी माहिती आहे की अमरसिंह यांच्यासोबत शिवपालही सुनिलसिंह यांच्या संपर्कात आहेत. दोघांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. आता निर्णय मुलायमसिंहांना घ्यायचा आहे. 

 पिता-पुत्रात मंगळवारी झाली समोरासमोर चर्चा 
 समाजवादी पार्टीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष आणि त्यासंबंधीचे नाट्य अजुनही संपलेले नाही. मंगळवारी देखील मुलायम व अखिलेश यांच्यात समाेरासमोर चर्चा झाली. पिता-पुत्रांतील बैठक ९० मिनिटे चालली. मुलायम यांच्या बंगल्यात ते गुफ्तगू झाले. त्याबाबत कोणत्याही नेत्यानेही काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही. मंगळवारी सकाळीच अखिलेश यांनी पित्याचे घर गाठले तेव्हा मीडियातून चर्चेला सुरुवात झाली होती. परंतु दोघांतील मतभेद दूर झाले असावेत, असे तर्कवितर्क दिवसभर लढवले जात होते. मात्र दोन्ही नेत्यांच्या चर्चेतून काहीही ठोस निघू शकलेले नाही. परंतु उभय नेत्यांमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
 
मुलायम यांनी अध्यक्षपद आपल्याकडेच असल्याचा दावा सोमवारी केला होता. त्याला अखिलेश यांनी आक्षेप घेतला आहे. माझ्या मागे पक्षातील बहुमत आहे. त्यामुळे माझा दावा अधिक महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर पक्षातील भावना देखील लक्षात येते, असे अखिलेश यांनी म्हटले आहे. परंतु मुलायम यांना त्यांचा दावा मान्य नाही. दुसरीकडे शुक्रवारी पक्षाचे चिन्ह असलेली सायकल नेमकी काेणाची हा वाद आता निवडणूक आयोगासमोर चर्चिला जाणार आहे. त्यात अंतिम फैसला होईल.
   
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुलायमसिंहाना मिळू शकणारे नवे चिन्ह... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)