आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शक बनवल्याने पक्षात सर्वात मोठा : मुलायमसिंह, ‘पक्षाचे चिन्ह आमचे’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - समाजवादी पार्टीत सायकल निवडणूक चिन्हावरून मुलायमसिंह व अखिलेश यादव गटांनी शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर आपापल्या बाजू मांडल्या. त्याचबरोबर दावे-प्रतिदावेही केले. आयोगाने सोमवारपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. परंतु सुनावणीनंतर बहुदा सायकल चिन्ह जप्त होण्याची अधिक शक्यता आहे. दुसरीकडे मला मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. त्यामुळे पक्षात मीच मोठा, असे मुलायम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  मुलायम यांचे वकील मोहन पराशरण म्हणाले, पक्षात फूट नाही. पक्ष एकसंध आहे. त्याचे प्रमुख मुलायमसिंह यादव आहेत. नुकतेच झालेले अधिवेशन चुकीचे आणि घटनाबाह्य होते. त्या अधिवेशनात मुलायम यांना मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आले. त्या नात्याने हे पद पक्षात सर्वोच्च आहे. अधिवेशन घटनाबाह्य होते. त्यामुळे पक्षाचे अध्यक्षपद अजूनही मुलायम यांच्याकडेच आहे. पक्षात फूट नाही, असा दावा तुम्ही केला आहे. मग सायकल चिन्ह कोणाला मिळावे हे सांगावे, अशी विचारणा निवडणूक आयोगाने केली.  
 
‘पक्षाचे चिन्ह आमचे’
मुलायम म्हणाले, पक्षाचे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे. त्यावर आयोग म्हणाले, याचाच अर्थ पक्षात फूट नक्कीच आहे. त्याअगोदर अखिलेश यांच्या गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी सुमारे दोन तास बाजू मांडली होती.  
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...