आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजवादी पार्टीची उत्तर प्रदेशात विशेष प्रचार मोहीम, राहुल यांच्या सभेनंतर निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी अलिगडमध्ये रॅली घेऊन काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आता समाजवादी पार्टीनेही प्रचारासाठी कंबर कसली आहे. आगामी काळात पार्टी राज्यात विविध शहरांत 18 रॅली घेणार आहे. 29 ऑक्टोबरला आझमगडमध्ये पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत होणार्‍या भव्य रॅलीपासून त्याची सुरुवात होणार आहे.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. राज्यातील सर्वाधिक जागा जिंकणार्‍या पक्षाला दिल्लीच्या राजकारणात वेगळे ‘अस्तित्व’ दाखवण्याची संधी मिळते. ही बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी अलिगडमध्ये रॅली घेतली. त्यात समाजवादी पार्टीची मुख्य व्होट बँक असलेल्या मुस्लिम समुदायाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने मुजफ्फरनगर दंगलीचा संदर्भ देत पक्षावर जोरदार टीका केली. या रॅलीत त्यांनी दलित व्होट बँकेसाठी मायावतींवर तसेच भाजपवरही टीका केली. त्यामुळे हे तिन्ही पक्ष काँग्रेसवर प्रचंड नाराज झाले आहेत. मायावती आणि सपा नेत्यांनी काँग्रेस, राहुल यांना जोरदार शाब्दिक प्रत्युत्तर दिले आहे. येथे पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुलायमसिंह यांनी मुजफ्फरनगरची दंगल दुर्दैवी असल्याचे सांगून त्याबद्दल दु:ख व्यक्त केले. यातील दोषींना शिक्षा केली जाईल, तसेच त्यात निर्दोष तरुणांना अडकू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राहुल यांच्या रॅलीला प्रत्युत्तर देण्यासाठी आता समाजवादी पार्टीही राज्यात रॅली घेणार आहे. त्याची सुरुवात आझमगडपासून करणार आहे. आझमगडची लोकभेची जागा

कुशवाह यांच्या पत्नीला सपाची उमेदवारी
लखनऊ - सत्तारूढ समाजवादी पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीत काही जागांवर नवे उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. एनआरएचएम घोटाळ्यात तुरुंगात गेलेले पक्षाचे माजी मंत्री बाबूसिंह कुशवाह यांच्या पत्नीला पक्ष गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार आहे.