आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील विद्यापीठांत समान अभ्यासक्रम, नव्या शैक्षणिक सत्रासाठी यूजीसीचा आराखडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - देशातील सर्व विद्यापीठांमध्ये समानता आणण्यासाठी आता एकसारखा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केला असून तो नव्या शैक्षणिक सत्रात लागू करण्याचा यूजीसीचा प्रयत्न आहे. ही योजना देशभर लागू झाल्यानंतर एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात तसेच महाविद्यालयांत सहजरीत्या प्रवेश घेऊ शकेल. यूजीसीचे तज्ज्ञ प्रोफेसर व्ही. के. कौल यांनी येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

प्रो. कौल यांनी सांगितले की, नव्या शैक्षणिक सत्रापासून चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिमच्या (सीबीसीएस) माध्यमातून ही प्रणाली नव्या शैक्षणिक सत्रापासून लागू व्हावी म्हणून वेगाने प्रयत्न केले जात आहेत. त्यासंदर्भात यूजीसीने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांत त्यासाठी आठ कार्यशाळा घेतल्या आहेत. त्याद्वारे विद्यापीठांना व महाविद्यालयांना नव्या बदलाची माहिती देण्यात आली आहे. प्रो. कौल यांनी येथे आयोजित कार्यशाळेतच यूजीसी तज्ज्ञ म्हणून त्याची माहिती सादर केली.

सेवानिवृत्त प्रोफेसरचे तज्ज्ञ पॅनल
यूजीसीने या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी देशभरात विद्यापीठांमधून निवृत्त झालेल्या तज्ज्ञ प्रोफेसर्सचा डाटाबेस तयार केला आहे. त्याआधारे त्यांचे तज्ज्ञ पॅनल तयार करण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीने अभ्यासक्रमांचा नियमित आढावा घेणे, त्यांची फेररचना करणे व त्यात एकसुसूत्रता आणण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महिन्यात बदलणार अभ्यासक्रम
सीबीसीएसबाबत विद्यार्थी एक अभ्यासक्रम शिकत असताना इच्छेनुसार दुसऱ्या अभ्यासक्रमाचे शिक्षणदेखील घेऊ शकतील. त्याचबरोबर एक अभ्यासक्रम सुरू असताना त्यांना तो बदलण्याची इच्छा असेल तर तशी सुविधा त्यांना उपलब्ध असेल. त्याचवेळी ते जुना अभ्यासक्रमदेखील सुरू ठेऊ शकतील. त्यासाठी प्रत्येक शाखा त्यांच्या पातळीवर अभ्यासक्रम बदलाची योजना तयार करून ती यूजीसीला तयार करणार आहे. नव्या बदलामुळे अभ्यासक्रमांच्या फीसचा आराखडादेखील बदलणार आहे.
बातम्या आणखी आहेत...