आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामवेद लिहिलेली 2500 वर्षे जुनी मोहोर सापडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिलाई / सेलूद - दुर्गपासून जवळ असलेल्या तरीघाट येथे 2500 वर्षे जुनी मोहोर मिळाली आहे. या मोहोरवर सामवेद लिहिलेले असून त्यातून बराचसा ऐतिहासिक तपशील समोर येण्याच्या शक्यता आहेत. म्हैसूरच्या अ‍ॅपिग्राफिक डिपार्टमेंटचे संचालक रविशंकर यांनी यास दुजोरा दिला आहे.
दुर्गपासून 40 कि मी दूर पाटण तहसीलच्या तरीघाट येथे गेल्या चार वर्षांपासून उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी अनेक पुरातत्त्वीय अवशेष मिळाले आहेत. येथेच काही मोहोरा मिळाल्या आहेत. त्यावर सामवेद अंकित करण्यात आलेले आहे. या मोहोरांची रुंदी अडीच सेंमी असून लांबी चार सेंमी आहे. ही मोहोर कुषाणकालीन असून यास पुढील संशोधनासाठी म्हैसूर येथे पाठवण्यात आले आहे. यावर चार अक्षरे व सहा बिंदू असल्याची माहिती विशेषज्ञांनी दिली. चार अक्षरांत सामवेद लिहिले असून यावरील लिपी ब्राह्मी भाषा प्राकृत आहे. वेदांची रचना कधी झाली, या प्रश्नाची उत्तरे यातून मिळू शकतील. सामवेद हा प्रथम वेद मानला जातो. मात्र, अद्याप एकाही वेदाचे पुरातत्त्विक अवशेष मिळालेले नाहीत.

सामवेद : एकूण चार वेदांपैकी सामवेद हा संगीताशी संबंधित आहे. यजुर्वेद यज्ञवेदींच्या मापन कला व गद्याशी संबंधित आहे. अथर्ववेद जादू, चमत्कार व आरोग्यविषयक आहे. मंत्रांची गेयता सामवेदात आहे. सामवेदाची मोहोर वेदाच्या प्रतिष्ठेला अधोरेखित करते.

तरीघाट होती माळा बनवण्याची व्यापारी पेठ
भरपूर प्रमाणात माळा मिळणारे तरीघाट हे भारतातील एकमेव पुरातत्त्व स्थळ आहे. आतापर्यंत विविध प्रकारच्या 2000 पेक्षाही जास्त माळा येथे मिळाल्या आहेत. हस्तिनापूर, अहिक्षेत्र, मथुरा, कौशांबी, श्रावस्ती येथेही माळा आढळल्या आहेत. येथे पूर्वी माळांचे उत्पादन व विक्री होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा कारखाना असून मध्य भारतातील हे महत्त्वाचे माळ उत्पादनाचे केंद्र असल्याचे उत्खनन संचालक जे. आर. भगत यांनी सांगितले.