आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangram Singh To Marry Payal Rohatgi After Death Contract Is Over

संग्राम सिंहने साइन केला \'Death Contract\', प्रेयसी आणि आईने केला विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- बिग बॉस फेम आणि रेसलर संग्राम सिंह)

रोहतक- 'रेसलिंग' (पैलवानी) हीच माझी खरी ओळख आहे. माझ्या नावापुढील रेसलर (पैलवान) हा शब्द काढून टाकला तर माझे अस्तित्वच नष्ट होईल. गेल्या तीन वर्षांपासून मी रेसलिंगपासून दूर राहिलो असल्याने माझी ओळख हरवली आहे. मला ती पुन्हा मिळवायची आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये आपण 'डेथ कॉन्ट्रेक्ट' (Death Contract) साइन केल्याचे 'बिग बॉस' फेम संग्राम सिंह याने म्हटले आहे. संग्राम सिंह हा रोहतकमधील मदीना येथील रहिवासी आहे.

दक्षिण आफ्रिकेतील रेसलिंग चॅम्पियनशिपमधील 'लास्ट मॅन स्टँडिंग फाइट' 28 फेब्रुवारीला होणार आहे. या स्पर्धेतून आपण जिंकून परतल्यास बक्षिसाची सर्व रक्कम गरीब रेसलर्सवर खर्च करणार असल्याचे संग्राम सिंह याने म्हटले आहे. 'डेथ कॉन्ट्रेक्ट' साइन करणारा संग्राम सिंह हा देशातील पहिलाच व्यक्ती आहे.

संग्राम याने नातेवाइकांशी चर्चा न करताच 'डेथ कॉन्ट्रॅक्ट' साइन केला आहे. विशेष म्हणजे त्याने प्रेयसी पायल रोहतगी आणि आईशी देखील चर्चा केलेली नाही. त्यामुळे दोघींनी संग्रामला स्पर्धेत सहभागी होण्यास विरोध केला आहे. कारण, 2011 मध्ये झालेल्या रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये संग्रामच्या नाकाचे हाड मोडले होते. तसेच त्याच्या छातीची एक फसळी तुटली होती.

आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन उतरणार रिंगणात...
आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी रवाना होणार असल्याचे संग्राम सिंह याने म्हटले आहे. रेसलिंग चॅम्पियनशिपची तयारी सुरु केली आहे. दररोज सहा तास तो आउटडोर सराव करतोय. दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी तो काही दिवस हरियाणा आणि दिल्लीतील रेसलर मित्रासोबत राहाणार आहे.

'लास्ट मॅन स्टँडिंग फाइट' 28 फेब्रुवारीला...
तब्बल तीन वर्षांनंतर रेसलिंगमध्ये री-इंट्री करणार्‍या संग्राम सिंह याची 'लास्ट मॅन स्टॅंडिंग फाइट' 28 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. 'बिग बॉस' आणि अन्य रियलिटी शोमध्ये सहभागी झाल्यामुळे संग्राम सिंहला तब्बल तीन वर्षे रेसलिंगपासून लांब राहावे लागले. मात्र, संग्रामला पैलवानीनेच ओळख मिळाली आहे. त्यामुळे त्याने पुन्हा पैलवानी करण्याचा निर्णय घेतला आहे.

'लास्ट मॅन स्टॅडिंग फाइट'मध्ये जो शेवटपर्यंत राहातो तो विजेता ठरत असतो. याचा असा की, संग्रामने थेट 'डेथ कॉन्ट्रेक्ट' साइन केला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये कॅनडा, जर्मनी, नायजीरिया, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशातील रेसलर सहभागी होणार आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, रेसलर संग्राम सिंह आणि प्रेयसी पायल रोहतगीचे निवडक फोटो...