आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sania Mirza Denied Any Tax Evasion Says Telangana Govt Gave Rs 1 Cr As Incentive

करचुकवेगिरी प्रकरणी सानियाचे स्पष्टीकरण, तेलंगाणा सरकारने दिला 1Cr चा इन्सेटिव्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- करचुकवेगिरी प्रकरणी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने स्पष्टीकरण दिले आहे. सेवाकर विभागाचे सर्व आरोप तिने फेटाळले आहेत. तेलंगाणा सरकारने आपल्याला 'ट्रेनिंग इन्सेंटिव्ह' स्वरूपात एक कोटी रुपये दिल्याचे तिने सेवा कर विभागाला सांगितले आहे.

दरम्यान, सेवाकर न भरल्याने सानिया मिर्झाला सेवाकर विभागाने नोटीस बजावली होती. हैदराबादमधील सेवा कर विभागाच्या प्रधान आयुक्तांनी 6 फेब्रुवारीला या प्रकरणी सानियाला समन्स बजावले. तिला 16 फेब्रुवारीला हजर होण्यास सांगितले होते. 
 
चार्टर्ड अकाउंटेंटनी केले सानियाचे प्रतिनिधित्व...
- सानियाच्या वतीने चार्टर्ड अकाउंटेंटनी गुरुवारी सेवाकर विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. सानिया सध्या विदेशात आहे. 
- सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, 'सानियाच्या चार्टर्ड अकाउंटेंटनी सेवाकर विभागाला  डॉक्युमेंट्‍स सादर केले आहेत. ट्रेनिंग इन्सेंटिव्ह स्वरुपात तेलंगाणा सरकारने तिला एक कोटी रुपये दिल्याचे त्यात म्हटले आहे. 
- राज्याचा ब्रँड अॅम्बेसडर म्हणून ही रक्कम सानियाला देण्यात आली नसल्याचे त्यात म्हटले आहे. 
- अधिकारी तपास याप्रकरणी तपास करत आहेत.
 
पुढील स्लाइडवर वाचा, सानिया बनली तेलंगाणाची ब्रँड अॅम्बेसडर

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...