आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanitation And Toilet Problem Young Woman Committed Suicide

आई-वडिल बांधत नव्हते घरात टॉयलेट, त्रस्त तरुणीने घेतला गळफास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्मक छायाचित्र
रांची / दुमका (झारखंड) - घरात टॉयलेट नसल्याने नाराज एका तरुणीने आत्महत्या केली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, तरुणीने घरात टॉयलेट बांधण्याचा आग्रह धरला होता, तर कुटुंबीयांनी प्रथम तुझे लग्न करु आणि नंतर टॉयलेट बांधू असे तिला सांगितले होते.
काय आहे प्रकरण
दुमका येथील शास्त्रीनगर मध्ये राहाणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने शुक्रवारी राहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तरुणीचे वडील ड्रायव्हर आहेत. तरुणीने बऱ्याच दिवसांपासून घरात टॉयलेट बांधण्याची मागणी केली होती. तिला 'बाहेर' जाण्याची लाज वाटत होती. त्यामुळे ती घरात टॉयलेट बांधण्याचा आग्रह धरत होती. मात्र तिच्या पालकांनी तिची मागणी धुडकावून लावली आणि पहिले तुझे लग्न होईल आणि त्यानंतर टॉयलेट बांधू असे त्यांनी तिला सांगितले होते. शुक्रवारी देखील तिने टॉयलेटचा विषय छेडला तेव्हा तिच्या आईने नकार दिला. त्यानंतर घरात एकटीच असताना तिने गळफास घेतला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.