आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या मंत्र्याने घेतली मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपींची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - केंद्रीय कृषि राज्यमंत्री संजीव बालियान यांनी सोमवारी मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपींची तुरुंगात जाऊन भेट घेतली. जवळपास एक तास चालेल्या चर्चेत मंत्री महोदयांनी आरोपींना संपूर्ण मदत केली जाईल असा विश्वास दिला.

मुझफ्फरनगर येथे 2013 मध्ये दंगल उसळली होती. यात 60 जण ठार झाले होते. बालियान यांनी ज्या लोकांची तुरुंगात भेट घेतली त्यांच्यावर खून आणि बलात्काराचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

कोणत्या आरोपींना भेटले बालियान
- केंद्रीय राज्यमंत्री बालियान यांनी इंद्रपाल, पुष्पेंद्र, कपिल आणि गौरव यांची भेट घेतली.
- इंद्रपालवर मुस्लिम कपलच्या खूनाचा आरोप आहे. त्याच्यासोबत आणखी 7 जणांवर गुन्हा दाखल आहे.
- गौरव, पुष्पेंद्र आणि कपिल यांच्यावर सामुहिक बलात्काराचा आरोप आहे. या प्रकरणात आणखी 4 आरोपी आहेत.

काय म्हणाले जेलर
मुझफ्फरनगर जिल्हा तुरुंग अधिकारी ए.एन. त्रिपाठी म्हणाले मंत्री बालियान यांनी तुरुंगात येऊन आरोपींची भेट घेतली हे खरे आहे. बालियान कोण-कोणत्या आरोपींना भेटले हे देखिल जेलर त्रिपाठी यांनी सांगितले.