आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'11 वर्षांचा नवरदेव 26 वर्षांची नवरी\', जाणून घ्या, काय आहे अनोख्या विवाहाचे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानमधील एका गावात 26 वर्षांच्या तरुणीचे 11वर्षांच्या मुलासोबत लग्न लावून दिले जाते. - Divya Marathi
राजस्थानमधील एका गावात 26 वर्षांच्या तरुणीचे 11वर्षांच्या मुलासोबत लग्न लावून दिले जाते.
जयपूर - जर 11 वर्षांच्या मुलाचे लग्न 26 वर्षांच्या मुलीसोबत लावून दिले तर ? धक्का बसला ना ! बालविवाहाच्या या अनोख्या कथेचे सत्य वेगळे आहे. देशातील अनेक भागात आजही बालविवाह होतात, ही सामाजिक समस्या 21 व्या शतकातही कायम आहे.

जाणून घ्या, काय आहे या विवाहाचे वास्तव
- वास्तविक आम्ही जी कथा सांगत आहोत ती सत्य घटना नाही तर फिल्मी आहे.
- ही कथा आहे राजस्थानमधील बालविवाहाच्या प्रथेवर आधारीत 'सांकल' या आगामी चित्रपटाची.
- इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्नसाठी सांकलची निवड झाली आहे.
16 जुलै रोजी या फेस्टिव्हलला सुरुवात होईल.

सत्य घटनेवर आधारीत चित्रपट
- चित्रपटाची कथा एका 26 वर्षांच्या मुलीभवती फिरते. तिचे लग्न एका अल्पवयीन मुलासोबत ठरवले जाते.
- हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. विदेशातील अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे कौतूक होत असून अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.
- चित्रपटात दाखवण्यात आले आहे की बालविवाहाचे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात.
दिग्दर्शक राजस्थानचा
- सांकलचा दिग्दर्शक दैदीप्य जोशी जयपूरचा रहिवासी आहे. त्याने राजस्थान विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
- 1992 मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याने कामाला सुरुवात केली. 1999 मध्ये त्याने स्वतः एका टीव्ही सीरियलचे दिग्दर्शन केले.
- 16 वर्षांच्या करिअरमध्ये त्याने आतापर्यंत 7 टीव्ही सीरियल, 35 डॉक्यूमेंट्री आणि 250 अॅड फिल्म तयार केल्या आहेत.
- सांकलमध्ये चेतन शर्मा, तनिमा भट्टाचार्य, हरीशकुमार, जगतसिंह, समर्थ शांडिल्य आणि मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा
- चित्रपटाची कथा राजस्थान आणि पाकिस्तान सीमेवरील एका गावात फुलते.
- या गावातील एक समाज आपले तथाकथित पावित्र्य टिकवण्यासाठी मुलींचा विवाह स्वतःच्या जातीतच करण्यासाठी आग्रही असतो.
- मात्र या समाजावर अशी वेळ येते की येथे मुलांची कमतरा भासायला लागते आणि त्यामुळे एका 26 वर्षांच्या मुलाचा विवाह 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत करुन दिला जातो.
- त्यानंतर यांच्या आयुष्यात कोणत्या अडचणी आणि उतार-चढाव येतात ही या चित्रपटाची थीम आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, या चित्रपटातील कलाकारांचे काही निवडक फोटोज्....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...