आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृत्यायन यांच्या तिबेटी हस्तलिखितांचा होणार अनुवाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी तिबेटहून आणलेल्या सहा हजारांपेक्षा जास्त हस्तलिखितांचा अनुवाद करण्यातील अडथळे दूर झाले आहेत. सोमवारपासून त्यावरील काम सुरू होणार आहे. सारनाथ येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटियन स्टडीज विभागातील पेम्पा दोरजी यांच्या नेतृत्वाखालील टीम अनुवादाचे काम करेल. ही हस्तलिखिते बिहार रिसर्च सोसायटी येथे संरक्षित करून ठेवली आहेत. यात चार हजार हस्तलिखिते तिबेटियन भाषेतील असून त्यात बौद्ध धर्माबाबत माहिती आहे.


महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी ही पुस्तके 1929, 1934, 1936 आणि 1938 मध्ये तिबेटमधून आणली होती. ती बिहार रिसर्च सोसायटीकडे देण्यात आली. पाटणा संग्रहालयाचे अतिरिक्त संचालक जेपीएन सिंह म्हणाले की, या हस्तलिखितांचा अनुवाद करण्यासाठी सारनाथ व धर्मशाला येथील तिबेटियन संस्थांची मदत मागण्यात आली होती.
भारतातून नेली होती पुस्तके : ही हस्तलिखिते खरे तर भारतातूनच तिबेटात नेण्यात आली होती. सातव्या शतकात आणि त्यानंतर विविध बौद्ध विद्वानांनी ती नेली होती. या विद्वानांमध्ये दीपांकर श्रीज्ञान, अतीश शांती रक्षित, प्रज्ञाकर गुप्त, पद्मसंभव इत्यादी प्रमुख विद्वानांचा समावेश होता. त्यांनी भारतातून बौद्ध धर्मावरील संस्कृत भाषेतील हस्तलिखिते नेली होती. त्यानंतर ती तिबेटी भाषेत अनुवादित करण्यात आली आणि मूळ संस्कृत हस्तलिखिते नष्ट झाली.


दुर्मिळ हस्तलिखिते : बौद्ध पंडित धर्मकीर्ती लिखित प्रमाणवार्तिक हा ग्रंथही तिबेटात नेला होता. तेथे या पुस्तकावर प्रज्ञाकर गुप्त यांनी ‘प्रमाणवार्तिक भाष्यम्’, मनोरथ नंदिन यांनी ‘प्रमाणवार्तिक वृति’ व कर्णक गोमिण यांनी ‘प्रमाणवार्तिक स्ववृति टीका’ रचले होते. ही हस्तलिखिते जपानच्या नारिसातन इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज व बिहार रिसर्च सोसायटीने 1998 मध्ये पुस्तकरूपात प्रकाशित केली. तीनही पुस्तकांच्या सेटची किंमत 1.25 लाख रुपये आहे.